घरदेश-विदेशमध्यप्रदेशमध्ये पत्नी लठ्ठ असल्याने तलाक देणाऱ्या पतीला अटक

मध्यप्रदेशमध्ये पत्नी लठ्ठ असल्याने तलाक देणाऱ्या पतीला अटक

Subscribe

पत्नी लठ्ठ असल्यामुळे पतीने तीन वेळा तलाक बोलून सोडून दिले. पोलिसांनी आरोपी पतीविरोधात गुन्हा दाखल करत अटक केली आहे.

मध्य प्रदेशच्या झाबुआ जिल्ह्यामध्ये पत्नीला तिहेरी तलाक दिल्या प्रकरणी पतीला पोलिसांनी अटक केली आहे. झांबुआ जिल्ह्यातील मेघनगरमधून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. आरिफ हुसैन असे आरोपीचे नाव असून १२ ऑक्टोबरला आरिफ हुसैनने आपल्या ३० वर्षिय पत्नी सलमाला तीन वेळा तलाक बोलून सोडून दिले होते. मी लठ्ठ असल्यामुळे पतीने मला तिहेरी तलाक दिला असल्याचा दावा सलमाने केला आहे. सलमाला दोन मुलं आहेत. याप्रकरणी सलमाने २३ ऑक्टोबरला मेघनगर पोलीस ठाण्यात पतीविरोधात तक्रार दाखल केली होती.

सलमाला करत होते मारहाण

१० वर्षापूर्वी सलमाचे लग्न आरिफ हुसैनसोबत झाले होते. तिला दोन मुलं आहेत. सलमाला तिचा नवरा आरिफ आणि सासून छोट्या-छोट्या गोष्टीवरुन मारहाण करायचे तसंच शिविगाळ करायचे. कधी कधी जेवायला कमी द्यायचे. सलमाने पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीमध्ये सांगितले आहे की, ११ ऑक्टोबरला आरिफने सलमाला घराच्याबाहेर काढले. त्यानंतर सलमा तिच्या भावाच्या घरी निघून गेली. दुसऱ्या दिवशी १२ ऑक्टोबरला सलमाचा नवरा आणि सासू मेघनगरला आले आणि तिथे त्यांनी तिला मारहाण केली.

- Advertisement -

पती तीन वेळा तलाक बोलला

त्यानंतर सलमाला आरिफने तीन वेळा तलाक बोलून निघून गेला. तलाक बोलल्यानंतर आरिफने आणि त्याच्या आईने सलमाच्या दोन्ही मुलांना सोबत घेऊन गेले. सलमाने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी तिला जीवे मारण्याची धमकी दिली. सलमाने असे सांगितले आहे की, आरिफने यासाठी तिला तलाक दिला कारण ती लठ्ठ आहे. लग्नानंतर दोन मुलं झाल्यानंतर सलमा लठ्ठ झाली. त्यामुळे तिला तिचा नवरा आणि सासरची लोकं सतत टोमणे मारायचे.

आरोपी पतीला अटक

सलमाने पती आरिफच्या विरोधात मेघनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी सलमाच्या तक्रारीनंतर आरिफवर कलम ३२३ आणि कलम ४९८ अंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर आरिफला पोलिसांनी अटक केली आहे. तिहेरी तलाक प्रतिबंध कायद्याला मंजूरी दिल्यानंतर ही पहिली अटक असल्याचे म्हटले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -