घरक्रीडामैदानाबाहेरही कोहलीच 'किंग'

मैदानाबाहेरही कोहलीच ‘किंग’

Subscribe

फलंदाजी करताना धावांचा डोंगर उभारणारा विराट कोहली कमाईच्या बाबतीत देखील मागे नाही.

क्रिकेटच्या मैदानावर नवनवे विक्रम करणारा भारताचा कर्णधार विराट कोहली मैदानाबाहेरही विक्रम करण्यात मागे नसतो. फलंदाजी करताना धावांचा डोंगर उभारणारा विराट कोहली कमाईच्या बाबतीत देखील मागे नाही. कोहली क्रिकेट खेळून खूप पैसे कमवतोच पण इतर माध्यमांतून देखील तो कोटींची कमाई करतो.

१३४ कोटी जाहीरातींच्या माध्यमातून

फोर्ब्सच्या माहितीनुसार विराट कोहलीने २०१८ वर्षात १६१ कोटींची कमाई केली आहे. ज्यामध्ये २७ कोटी त्याने पगार आणि बक्षीसांच्या माध्यमातून कमावले आहेत. तर कोहलीने १३४ कोटी जाहीरातींच्या माध्यमातून कमावले आहेत. इतकी मोठी कमाई करणार कोहली हा एकमेव भारतीय आणि क्रिकेटपटू आहे. कोहली प्यूमा, पेप्सी, ऑडी, टीसॉट यांसारख्या मोठ्या आणि प्रचलित कंपन्यांचा ब्रंड अॅम्बेसेडर आहे.

इंस्टाग्रामवरून सर्वाधिक कमाई करणारा क्रिकेटपटू

इतकेच नाही तर कोहलीला इंस्टाग्रामवर एका प्रमोशनल पोस्टसाठी १.२० लाख डॉलर म्हणजेच ८२ लाख रुपये मिळतात. इंस्टाग्रामवरून सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत कोहलीचा नववा क्रमांक लागतो. पण तो इंस्टाग्रामवरून सर्वाधिक कमाई करणारा क्रिकेटपटू आहे.

कोहली आणि अनुष्काची एकूण संपत्ती ६१० कोटी

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाच्या वार्षिक कराराच्या अ+ श्रेणीमध्ये येतो. त्यामुळे त्याला वर्षभरात ७ कोटी रुपये मिळतात. तसेच आयपीएलच्या एका मोसमात खेळण्यासाठी त्याला १७ कोटी रूपये मिळतात. बॉलिवूड अभिनेत्री अनुष्‍का शर्मासोबत विवाह केल्यानंतर त्याच्या संपत्तीमध्ये दुप्पट वाढ झाली आहे. कोहलीची एकूण संपत्तीची ३९० कोटी इतकी आहे. तर कोहली आणि अनुष्काची एकूण संपत्ती ६१० कोटी आहे.  
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -