धाडस जीवावर बेतले! reel साठी बर्फाच्या नदीत मारली उडी अन् पत्नी बनवत राहिली Video

Man asked wife to film him before jumping into icy river and being swept to his death
धाडस जीवावर बेतले! reel साठी बर्फाच्या नदीत मारली उडी अन् पत्नी बनवत राहिली Video

आजकाल लोकप्रिय होण्यासाठी अनेक प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. त्यापैकी एक म्हणजे इन्स्टाग्राम. या इन्स्टाग्रामवरील रीलद्वारे काही जण मजेशीर व्हिडिओ, माहितीपूर्ण व्हिडिओ तयार करतात. पण काही जण असे काही व्हिडिओ तयार करतात की ते त्यांच्या जीवावर बेतात. काही दिवसांपूर्वी थेरगाव क्वीन नावाने इन्स्टाग्राम अकाउंट चालवणारी मुलीने रिलमध्ये अश्लील शिवीगाळ केल्यामुळे जेलची हवा खाली होती. आता रिलमुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

अलेक्झांडर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या व्यक्तीने रविवारी युक्रेनच्या डनिप्रॉपेट्रोव्स्क प्रदेशातील बर्फाच्छादित चोर्टोमेलिक नदीत उडी मारताना त्याने पत्नीला व्हिडिओ बनवण्यास सांगितले. पण यादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

द मिररच्या वृत्तानुसार, हा स्टंट घातक असल्याचे सिद्ध झाले आहे. या व्यक्तीचा बचाव करण्याचा खूप प्रयत्न केला, पण तरीही तो वाहून गेला. जवळपास 5C तापमानात झालेल्या घटनेचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये पत्नीने पतीला विचारले की, ‘तुम्ही घाबरत नाही का सान्या (अलेक्झांडर)?’ यावर तो उत्तर देताना म्हणाला की, ‘मी घाबरत नाही.’ त्यानंतर पत्नीने विचारले की, ‘तुला थंडी वाजत नाही का?’ तर त्यावर तो म्हणाला की, ‘नाही.’ पण पुन्हा पत्नीने विचारले की, ‘तुझे पाय थंड नाहीत का?’ तरी तो ‘नाही’ म्हणाला. मग पत्नी म्हणाली की, ‘हे ईश्वरा मी ही थंडी सहन करू शकत नाही. हे खूप थंड आहे. तू आजारी पडणार नाहीस, अशी मला आशा आहे.’

दोघांच्या या संभाषणनंतर त्याने बर्फाच्छादीत नदीत उडी मारली आणि अवघ्या काही क्षणात गायब झाला. मग पत्नी घाबरली आणि आजूबाजूला लोकांकडून मदत मागायला लागली आणि म्हणाली की, हे ईश्वरा, मला नाही माहिती काय करायचे? अशा वेळी तिथे बचाव करणारे लोकं आले. त्यांनी इतर ठिकाणी बर्फाला छिद्र करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचा बचाव करण्यासाठीचा वेळ निघू गेला होता. स्थानिक वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, सिकंदर बर्फाच्या खाली अडकून डुबून गेला. बचाव कर्मचाऱ्यांनी नदीत उडी मारली होती, परंतु त्याचा मृत्यू झाला होता. त्याचा मृतदेह दुसऱ्या दिवशी १३ फूट खोल गेला होता. तसेच किनाऱ्यापासून ७० फूट दूर आढळला होता.


हेही वाचा – विमानात बिजनेस क्लासमध्ये महिला प्रवाशावर बलात्कार