घरदेश-विदेशTikTok वर हिरो बनण्यासाठी पठ्ठ्याचं धाडस! काढला सिंहासोबत सेल्फी आणि...

TikTok वर हिरो बनण्यासाठी पठ्ठ्याचं धाडस! काढला सिंहासोबत सेल्फी आणि…

Subscribe

हा टिकटॉक व्हिडीओ भारतीय वन अधिकारी प्रवीण कासवान यांनी ट्विटरवर शेअर केला आहे

टिकटॉकवर दररोज बरेच व्हिडीओ व्हायरल होतात, एखादा व्हिडीओ पाहून लोकांना हसू आवरणं कठीण होतं तर काही व्हिडीओ बघताच क्षणी भावूक करतात. तर काही व्हिडीओ इतके वादग्रस्त असतात की त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाते. अलीकडेच, एका टिकटॉक यूजर फैसल सिद्दीकीचा एक व्हिडीओ टिकटॉकने काढून टाकला कारण त्यामध्ये अ‍ॅसिड हल्ला करण्यास प्रेरित केले होते. मात्र असाच एक व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे, त्यामध्ये टिकटॉकवर फेमस होण्यासाठी एकाने चक्क सिंहाबरोबर सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी हा व्यक्ती आपला जीव धोक्यात घालून सेल्फी काढत असताना पोलिसांच्या तावडीत सापडला आणि त्याला पोलिसांनी अटक केली.

हा टिकटॉक व्हिडीओ भारतीय वन अधिकारी प्रवीण कासवान यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. ज्यामध्ये असे दिसून येते की, या व्यक्तीसमोर दोन सिंह बसले आहेत. तो माणूस मोबाइलने त्यांच्यासोबत सेल्फी घेत असून या व्हिडीओला मागे बॉलिवूड गाणं सुरू आहे. दरम्यान, या व्यक्तीला अटक करण्यात आल्याची माहिती देखील प्रवीण कासवान यांनी दिली आहे.

बघा व्हिडीओ

- Advertisement -

वन अधिकाऱ्यांनी हा व्हिडिओ १९ मे रोजी सकाळी शेअर केला होता, ज्याला आतापर्यंत ५ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाली आहेत. या व्हिडीओ ट्विटरवर पाहून लोक त्या व्यक्तीवर चिडून त्याच्यावर खूप टीका देखील केल्यात.

- Advertisement -


बघा प्रतिक्रिया…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -