घरताज्या घडामोडीदिल्लीच्या उपमुख्यमंत्र्यांना कोरोनानंतर झाला डेंग्यू, दुसऱ्या रुग्णालयात केले शिफ्ट

दिल्लीच्या उपमुख्यमंत्र्यांना कोरोनानंतर झाला डेंग्यू, दुसऱ्या रुग्णालयात केले शिफ्ट

Subscribe

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी मॅक्स रुग्णालयात शिफ्ट करण्यात आले आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर मनीष सिसोदिया यांना डेंग्यू झाला आहे. मनीष सिसोदिया यांना कोरोना झाल्यानंतर एलएनजेपी रुग्णालयात दाखल केले होते. पण आता एलएनजेपीमधून मॅक्स रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

१४ सप्टेंबर रोजी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यानंतर त्यांनी घरी स्वतः आयसोलेटेड करून घेतले होते. पण कालच मनीष सोसिदिया यांना ताप आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे लोकनायक जयप्रकाश (एलएनजेपी) रुग्णालयात दाखल केले होते. पण आता मनीष सिसोरिदाय यांना डेंग्यू झाल्याचे समोर आले आहे. आज तकच्या वृत्तानुसार, त्याच्या प्लेटलेट्स सतत कमी होत आहेत. त्यामुळे त्यांची तब्येत बिघडल्याने आता त्यांना मॅक्स रुग्णालयात हलवण्यात आले आहे. डॉक्टरांच्या पथकाच्या निगरानी खाली मनीष सिसोदियावर उपचार करणार आहेत.

- Advertisement -

कोरोनाच्या संकटकाळात १४ सप्टेंबर रोजी दिल्ली विधानसभेचे एक दिवसीय विशेष अधिवेशन बोलविण्यात आले होते. पण मनीष सिसोदिया प्रकृती ठिक नसल्यामुळे त्यांनी या सत्रात भाग घेतला नाही. त्यानंतर मनीष सिसोदियाची प्रकृती खालावत गेली. त्याचदरम्यान दिल्लीचे तीन आमदार गिरीश सोनी, प्रमिला टोकस आणि विशेष रवी यांच्या व्यतिरिक्त आरोग्यमंत्री सत्यंदर जैन यांनाही कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळले.


हेही वाचा – ‘निंदकाचे घर असावे शेजारी’, मिलींद सोमणच्या त्या प्रश्नाला पंतप्रधानांनी दिलं उत्तर!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -