घरदेश-विदेशअमेरिकेत डेअरी फार्ममध्ये भीषण स्फोट; तब्बल 18 हजार गायी ठार

अमेरिकेत डेअरी फार्ममध्ये भीषण स्फोट; तब्बल 18 हजार गायी ठार

Subscribe

नवी दिल्ली : अमेरिकेच्या टेक्सास (Texas) शहरातून सर्वांना हादरून टाकणारी भीषण दुर्घटना घडली आहे. टेक्सासमधील डिमिट येथील साउथ फोर्क डेअरी फार्ममध्ये मंगळवारी भीषण स्फोट झाला (Massive explosion at South Fork dairy farm Tuesday). या स्फोटानंतर लागलेल्या आगीत 18 हजार गायींचा होरपळून मृत्यू (Death of 18 thousand cows) झाला आहे, एक व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे.

साउथ फोर्क डेअरी मशिनरीमुळे मिथेन वायू पेटला असावा, असा अधिकाऱ्यांचा प्राथमिक अंदाज आहे, मात्र स्फोटाचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. फॉर्ममध्ये लागलेली आग ही आतापर्यंतची सर्वात भीषण आग आहे. अमेरिकेत 2018 ते 2021 दरम्यान जवळपास 30 लाख प्राण्यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला होता.

- Advertisement -

सोमवारी भारतीय वेळेनुसार दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास डेअरी फार्ममध्ये भीषण आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. त्यानंतर पोलीस आणि आपातकालीन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी आत अडकलेल्या एका व्यक्तीची सुटका करून त्याला जखमी अवस्थेत तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. या भीषण आगीचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. यामध्ये धुराचे मोठे लोट दिसत आहेत.

- Advertisement -

आगीत होरपळून नेमक्या किती गाईंचा मृत्यू झाला आहे याची नेमकी माहिती मिळू शकली नाही, पण टेक्सासच्या शेरीफ कार्यालयाकडून जवळपास 18 हजार गाईंचा मृत्यू झाल्याचे बीबीसीला सांगितले आहे. शेरीफ साल रिवेरा यांनी आग ‘मध बॅजर’ नावाने ओळखल्या जाणार्‍या मशीनने लागली असावी असा अंदाज वर्तवला आहे. ही मशीन खत शोषण्याचे आणि पाणी बाहेर फेकण्याचे काम करते. त्यामुळे मशीन जास्त गरम झाल्यानंतर मिथेन किंवा त्यासारख्या वायू पेटला असवा आणि त्यानंतर स्फोट झाला असेल, असे त्यांनी सांगितले.

वॉशिंग्टन डीसीमधील प्राणी कल्याण संस्थेने सांगितले की, या आगीत जर 18 हजार गायींचा मृत्यू असेल तर 2013 मध्ये डेरी फार्ममधील आकडेवारी ठेवण्यास सुरुवात झाल्यानंतरची सर्वात प्राणघातक आग असेल, असे त्यांनी सांगितले. एडब्ल्यूआयच्या फार्म ऍनिमल प्रोग्रामचे पॉलिसी सहयोगी ऍली ग्रेंजर म्हणाले की, या घटनेनंतर यापुढे फार्ममध्ये आगीशी संबंधित सर्व सुरक्षांची उपाययोजना केली जाईल आणि आम्ही यावर लक्ष केंद्रित करू. जिवंत जळण्यापेक्षा इतर कोणत्याही वाईट गोष्टीची कल्पना करणे कठीण आहे, असेही त्यांनी सांगितले.

65 लाख जनावरांचा मृत्यू
ऑस्ट्रेलियन लोकर इनोव्हेशनच्या माहितीनुसार 2013 पासून 2018 पर्यंत सुमारे 65 लाख जनावरांचा फार्ममध्ये लागलेल्या आगीत मृत्यू झाला आहे. त्यापैकी 6 लाख कोंबड्या आणि 7,300 गायी होत्या. तसेच 2018 आणि 2021 दरम्यान जवळपास 30 लाख प्राण्यांचा मृत्यू झाला आहे. या कालावधीतील सहा सर्वात मोठ्या आगीत 17 लाख कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -