घरदेश-विदेशचक्क ६ वर्ष जुना बर्गर ऑनलाईन विक्रीला

चक्क ६ वर्ष जुना बर्गर ऑनलाईन विक्रीला

Subscribe

e-bay या वेबसाईटवरुन डेव अॅलेक्झांडर नावाच्या शेतकऱ्याने, चक्क ६ वर्ष जुना चीज बर्गर विक्रीसाठी ठेवला होता. अॅलेक्झांडरने हा बर्गर आणि फ्रेंच फ्राईस ७ जून २०१२ साली खरेदी केले होते.

विविध जीवनोपयोगी वस्तूंची ऑनलाईन खरेदी-विक्री करण्याची क्रेझ गेल्या काही वर्षांत चांगलीच वाढली आहे. छोट्याशा पेनापासून ते ए.सी.पर्यंत सगळ्या वस्तू घरबसल्या आणि त्याही गॅरेंटी-वॉरंटीसह मिळत असल्यामुळे लोकांची ऑनलाईन खरेदीला कायमच पसंती असते. मात्र, ऑनलाईन खरेदी-विक्रीच्या व्यवहारात कधी काय होईल याचा नेम नसतो. कधी तुम्ही मागवलेल्या वस्तू ऐवजी दुसरीच वस्तू येऊ शकते किंवा कोणीतरी एखादी भलतीच किंवा विचित्र वस्तू ऑनलाईन विक्रीसाठी ठेवू शकतो. काहीसा असाच प्रकार कॅनडामधील ऑंटॅरियोमध्ये नुकताच घडला. तिथल्या एका शेतकऱ्याने त्याच्याजवळचा ६ वर्ष जुना बर्गर आणि फ्राईज विक्रीसाठी ऑनलाईन अपलोड केल्या. e-bay या वेबसाईटवरुन डेव अॅलेक्झांडर नावाच्या शेतकऱ्याने ६ वर्ष जुने खाद्यपदार्थ विक्रीसाठी उपलब्ध केले होते. अॅलेक्झांडर याने हा बर्गर आणि फ्राईस ७ जून २०१२ साली खरेदी करण्यात केल्या होत्या.

गजब व्यवहारामागे कारण काय?

आश्चर्याची बाब म्हणजे विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या त्या ६ वर्ष जुन्या बर्गर आणि फ्राईजसाठी १५० डॉलर्सची बोली लावली गेली. मात्र, अशा पद्धतीचा व्यवहार गैर असून ते आपल्या पॉलीसीमध्ये बसत नसल्याचे सांगत, e-bay कंपनीने त्यावर रोख लावला. या गजब प्रकाराविषयी बोलताना अॅलेक्झांडर म्हणाले, ”आम्ही शेती करतो आणि राहतोही शेतातच. त्याठिकाणी खाद्यपदार्थ साठवणीच्या सुविधा नसल्यामुळे ठराविक काळानंतर सगळेच पदार्थ खराब होतात. मात्र, शहरातही असेच होते का हे पाहण्यासाठी मी हा गजब प्रयोग केला. माझ्या मुलीने फास्टफूडच्या दुकानातून आणलेले  हे पदार्थ मी त्यांचं आयुष्य किती आहे हे तपासण्यासाठी ठेवले. अॅलेक्झांडरच्या म्हणण्यानुसार, चीज बर्गर आणि फ्रेंच फ्राईज आजच विकत घेतल्यासारखे दिसत आहेत. मात्र, प्रत्यक्षात तो बर्गर कडक झाल्याचे आणि काळा पडल्याचे फोटोत दिसत आहे.

- Advertisement -
6 year old McDonald’s cheeseburger
फोटो सौजन्य- globalnews.ca

… यासाठी केली ऑनलाईन विक्री

आपला प्रयोग पूर्ण झाल्यानंतर अॅलेक्झंडर आणि त्यांच्या पत्नीने हा खास बर्गर स्वत:जवळ न बाळगण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे या दोघांनी ई-बे या वेबसाईटवरुन हा ६ वर्ष जुना बर्गर आणि फ्राईस विक्रीसाठी ठेवले. हे पदार्थ विक्रीसाठी उपलब्ध करतेवेळी या दोन्हीचे मिळून एकूण २९ डॉलर + सर्व्हिस चार्जेस अशी किंमत त्यांनी निश्चीत केली. मात्र, काही वेळातच या जुन्या बर्गरसाठीची बोली वाढत गेली आणि अखेर १५० डॉलर अर्थात ७ हजार ८६९ रुपयांची अंतिम बोली लागली. गमतीचा भाग म्हणजे, ‘इतका जुना बर्गर खाण्यायोग्य आहे का? असंही काही लोकांनी विचारल्याचं’, अॅलेक्झांडरने सोशल मीडियाद्वारे म्हटलं आहे. ‘मात्र, खाण्यायोग्य वाटणारे हे पदार्थ खराब झाले असून, ते खाण्यायोग्य नसल्याचं मी लोकांना सांगितलं असल्याचंही’, अॅलेक्झांडरने स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -