घरमुंबईवैद्यकीय महाविद्यालये, मनपा रुग्णालयांची सुरक्षा वाऱ्यावर

वैद्यकीय महाविद्यालये, मनपा रुग्णालयांची सुरक्षा वाऱ्यावर

Subscribe

मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपासून आगीच्या घटनेत वाढ होत आहे. महानगरपालिकेच्या ताब्यात असलेल्या वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांच्या फायर आॅडीटची माहीती मागितली असता ती देण्यास अग्निशमन दलाने टाळाटाळ केली आहे.

मुंबईत आगीच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत असतानाही मुंबई अग्निशमन दलातर्फे मात्र फायर ऑडिटकडे दुर्लक्ष होत आहे. आरटीआयच्या माध्यमातून मनपा वैद्यकिय महाविद्यालय आणि रुग्णालयांची सुरक्षिततेच्या दृष्टीने फायर ऑडिट झालेल्या इमारतीची माहिती मागितली असता अग्निशमन दलाने माहीती देण्यास टाळाटाळ केली आहे. आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी मुंबई अग्निशमन दलाकडे मनपा महाविद्यालय-रुग्णालयच्या फायर ऑडिट, केलेल्या इमारतीची माहिती आणि फायर ऑडिट न झालेल्या इमारतीची यादी तसेच महाविद्यालय-रुग्णालयाच्या अग्नि सुरक्षिततेच्या दृष्टीने परिपूर्ण नसल्याने त्या अनुषंगाने अपेक्षित कार्यवाही याची माहिती मागितली होती. जनमाहिती अधिकारी तथा विभागीय अग्निशमन विभागाने माहिती देण्याचे टाळले असून, मुंबई अग्निशमन दलाचे अभिलेख हा इमारतीच्या सी. एस. क्रमांक व विभागानुसार परीक्षित केला जातो.

तरी सदर इमारतीचा सी. एस. क्रमांक व विभागानुसार या कार्यालयास कळविण्यात यावा जेणेकरून माहिती पुरविणे शक्य होईल, असे कारण दिलेले आहे. मुंबईत किती महाविद्यालय-रुग्णालय सुरक्षिततेच्या दृष्टीने परिपूर्ण आहेत फायर ऑडिट अहवाल प्राप्त झाले पण किती महाविद्यालय-रुग्णालय सुरक्षिततेच्या दृष्टीने परिपूर्ण नाहीत, याची माहिती मात्र दिली गेली नाही.

- Advertisement -

महानगरपालिकेची महाविद्यालये आणि रुग्णालये.

मुंबई महानगरपालिकेची स्वत:ची चार वैद्यकिय महाविद्यालये-रुग्णालये, एक दंत रुग्णालय, ६ विशेष रुग्णालये, १६ सामान्य रुग्णालये, २९ मनपा प्रसूतिगृह आणि १७५ मनपा दवाखाने आहेत. मुंबईतील ३४ अग्निशमन केंद्राच्या हद्दीतील नामनिर्देशित अधिकारी यांना इमारतीची तपासणी करण्याचे अधिकार देण्यात आले असून फायर ऑडिट सारखी महत्वाची माहिती अग्निशमन दल का देत नाही? त्याचबरोबर मुंबई अग्निशमन दलाला स्वतः त्यांच्या इमारतीचा सी. एस. क्रमांक माहित का नाही ? असे बरेच प्रश्न सध्या निर्माण झाले आहेत.

आगीच्या दुर्घटनांमध्ये १३० लोकांचा मृत्यू

गेल्यावर्षी मुंबईमध्ये आगीत कमीत कमी १३० लोकांचा मृत्यू झाला. जर सदर मनपा वैद्याकिय महाविद्यालये-रुग्णालये, सामान्य रुग्णालये, दंत रुग्णालय, प्रसूतिगृह आणि दवाखान्यात अग्नि सुरक्षिततेच्या दृष्टीने परिपूर्ण व अग्निप्रतिबंधक यंत्रणा नसल्यामुळे काही आगीच्या दुर्घटना झाल्या तर मोठ्या प्रमाणात जीवितहानी होऊ शकते. पण असे असूनही अग्निशमन दल माहीती देण्यास टाळाटाळ करत असल्याचे दिसून येत आहे. मुंबईमध्ये गेल्या वर्षभरात अनेक ठिकाणी आगीच्या दुर्घटना घडलेल्या आहेत यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असून आता महानगरपालिकेचीच महाविद्यालय आणि रुग्णालये किती सुरक्षित आहेत? असा प्रश्न पडलेला आहे. कारण अग्निशमन दलातर्फे त्यांच्या सुरक्षेचा अहवाल देण्यास टाळाटाळ केली आहे, असा आरोप आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -