घरCORONA UPDATELockdown - पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांची गय केली जाणार नाही - अनिल देशमुख

Lockdown – पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांची गय केली जाणार नाही – अनिल देशमुख

Subscribe

सर्व पोलीस यंत्रणेच्या कामाचा मला गर्व आहे. पोलीसांवर व आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ले होत असेल तर हल्लेखोरांचा समाचार योग्य पध्दतीने घेतला जाईल असा दम हल्लेखोरांना भरला आहे.

राज्यात सध्या कोरोनाचे संकट असून, दिवसेंदिवस रुग्णांचा आकडा हा वाढत आहेत. त्यातच लॉक डाऊनच्या काळात पोलीस आणि डॉक्टरवर होणाऱ्या हल्ल्याच्या घटना देखील समोर येऊ लागल्या आहेत. यामुळेच आता डॉक्टर आणि पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांची गय केली जाणार नाही असे सरकारच्या वतीने सांगितले आहे. खुद्द गृहमंत्री अनिल देशमुख यांनी

सर्व पोलीस यंत्रणेच्या कामाचा मला गर्व आहे. पोलीसांवर व आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ले होत असेल तर हल्लेखोरांचा समाचार योग्य पध्दतीने घेतला जाईल असा दम हल्लेखोरांना भरला आहे.

- Advertisement -

दरम्यान बारामतीमध्ये होम क्वारंटाइन’ असलेल्या नागरिकांनी घराबाहेर फिरू नये, असे सांगण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकावरच जमावाने जोरदार हल्ला चढवल्याची घटना घडली होती.  यामध्ये पोलिस निरीक्षकासह तीन अधिकारी आणि सहा कर्मचारी गंभीर जखमी झाले होते. त्यातच डॉक्टरना रुग्णाच्या नातेवाईकांचा संताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे आता गृहमंत्र्यांनी हल्लेखोरांना हा दम भरला आहे.

अजित दादानीही भरला दम –

दरम्यान दोन दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी करोना’ प्रतिबंधक कर्तव्य बजावणाऱ्या पोलिस, वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याच्या घटना कदापिही सहन केल्या जाणार नाहीत, असे हल्ले करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करुन कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असा इशारा दिला होता. तसेच पोलिस आणि नागरिक दोघांनीही स्वयंशिस्त, संयम पाळावा, असे आवाहनही त्यांनी केले होते. एवढेच नाही तर ‘लॉकडाऊन’च्या अंमलबजावणीसाठी अमेरिकेत लष्कराची मदत घेण्यात आली आहे. आपल्या राज्यात ती वेळ येऊ न देणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे, असेही त्यांनी म्हटले होते.

- Advertisement -

हे ही वाचा – डॉक्टर व पोलिसांवरील हल्ले सहन केले जाणार नाहीत, अजित पवारांनी हल्लेखोरांना भरला दम


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -