घरताज्या घडामोडीराजस्थानच्या बाडमेर येथे सरावादरम्यान MIG-21 फाइटर जेट कोसळले, पायलट सुरक्षित

राजस्थानच्या बाडमेर येथे सरावादरम्यान MIG-21 फाइटर जेट कोसळले, पायलट सुरक्षित

Subscribe

घटनेबाबत कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश देण्यात आले आहेत.

राजस्थानच्या (Rajstan) बाडमेर (Barmer) जिल्ह्यात बुधवारी भारतीय वायुसेनेचे फायटर विमान मिग-२१ बाइसन क्रॅश (MIG-21 bison)  झाले आहे. मिग-२१ बाइसन विमानातील पायलट या दुर्घटनेत सुदैवाने वाचला आहे. घटनेबाबत कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश देण्यात आले आहेत. विमान क्रॅश झाल्यानंतर शेतात पडले. मिळालेल्या माहितीनुसार, बाडमेर जिल्ह्याच्या ३५ किलोमीटर दूर मातासर गावात जवळपास संध्याकाळी ५ वाजताच्या सुमारास ट्रेनिंगसाठी निघालेले मिग-२१ हे विमान क्रॅश झाले. घटना घडताच उत्तरलाईहून वायु सेनेचे अधिकारी आणि आपल्या टीमसोबत हेलिकॉप्टरने घटनास्थळी दाखल झाले. (MIG-21 fighter jet crashes during training at Barmer Rajasthan pilot safe)

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, विमान क्रॅश झाल्यानंतर त्याने पेट घेतला आणि शेतात पडले त्यानंतर शेताला देखील आग लागली. गावकऱ्यांनी वेळीच प्रसंगावधान दाखवून आगीवर पाणी टाकून आग विझवण्याचा प्रयत्न केला. यात विमानाच्या पायलट सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे.

याआधी तीन महिन्यांपूर्वी भारतीय वायुसेनेचे एक मिग-२१ फाइटर जेट पंजाबच्या मोगा येथील कस्बा बाघापुराना येथे क्रॅश होऊन मोठा अपघात झाला होता. या दुर्घटनेत पायलटचा मृत्यू झाला होता. मिग -२१ विमानाने राजस्थानच्या सूरतगड ते हलवारा आणि हलवारा ते सूरतगड असे उड्डाण घेतले होते. दरम्यान बाघापुराना जवळील लंगियाना खुर्द गावात विमान क्रॅश झाले.

- Advertisement -

हेही वाचा – १८ वर्षावरील मतदान करु शकतात, मग दारू का पिऊ शकत नाही? HC ने दिल्ली सरकारला केला सवाल

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -