घरCORONA UPDATEजुगाड! मजुरांनी हातगाडी सायकलला जोडून केला हरियाणा ते प्रयागराजपर्यंतचा प्रवास

जुगाड! मजुरांनी हातगाडी सायकलला जोडून केला हरियाणा ते प्रयागराजपर्यंतचा प्रवास

Subscribe

लॉकडाऊनमध्ये लाखो कामगार, मजुर यांचे खाण्या-पिण्याचे हाल झाल्यामुळे त्यांनी आपापल्या गावाचा रस्ता धरला. लाखोंप्रच्या संख्येने देशात स्थलांतरीत झालेल्या मजुरांनी कधी, पायी तर कधी मिळेल त्या वाहनांनी प्रवास करत घर काढले. अशातच प्रवासासाठी हातगाडी आणि सायकलचा मिळून वापर करणारे मजूरदेखील पाहायला मिळाले आहेत. हरियाणावरून हातगाडीला सायकल जोडून त्यातून प्रयागराजपर्यंत ९०० किमीचा प्रवासासाठीचा जुगाड काही मजुरांनी केल्याचे समोर आले आहे. या मजुरांनी सांगितले की, प्रवासासाठी बसची सेवा तर उपलब्ध होती पण त्यात सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नव्हते. त्याचे पालन करण्याकरता अशा प्रवासाचा मार्ग आम्ही निवडला.

असा केला जुगाड 

मजुरांनी रिक्षा ट्रॉली बनवत हरियाणा ते प्रयागराज असा प्रवास केला. त्यांनी हा प्रवास करण्यासाठी स्कूटरला मधून कट करून त्याला रिक्षा ट्रॉली बनवली. त्यामध्ये काही लोकांनी बसून हा प्रवास केला. त्यानंतर पुढच्या रिक्षाला पायाने ढकलत ते पुढे पुढे सरकू लागले. या रिक्षामध्ये त्यांनी आपल्या कुटुंबियांना बसवले होते. तब्बल ११ मजुरांनी सहा दिवसांत हरियाणा ते प्रयागराज हा प्रवास केला. वाटेत अनेकदा त्यांची ही जुगाडू गाडी बंद देखील पडली. त्याचे टायर पंक्चर झाले. परंतू त्यांनी ती दुरूस्त करून प्रवास पूर्ण केला.

- Advertisement -

हेही वाचा –

Indian Railway : १ जूनपासून नॉन एसी रेल्वे सुरू होणार! रेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -