घरताज्या घडामोडीRussia-Ukraine War: युक्रेनच्या 'ब्युटी क्वीन'ने देशासाठी घेतली हातात बंदूक; सैन्यात झाली सामील

Russia-Ukraine War: युक्रेनच्या ‘ब्युटी क्वीन’ने देशासाठी घेतली हातात बंदूक; सैन्यात झाली सामील

Subscribe

युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धातचा आजचा पाचवा दिवस आहे. रशियाविरोधी कारवाई करण्यासाठी युक्रेनमधल्या अनेक महिलांनी शस्त्र हातात घेतले आहे. यामध्ये युक्रेनची सर्वात सुंदर महिला अशी ओळख असणारी अनास्तासिया केन हीचा देखील समावेश आहे. सध्या अनास्तासियाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर महत्वपूर्ण संदेश लष्करी सेनेला दिला आहे.

युक्रेन आणि रशिया यांच्यामध्ये युद्धाचे रणधुमाळी सुरू आहे. याचे पडसाद इतर देशावरही पडत आहेत. युक्रेनच्या सैन्यात रशियाने हल्ले करत युक्रेनच्या लष्करावर कारवाई करण्यास सुरुवात केलीय. आज युद्धाचा पाचवा दिवस आहे. मात्र अद्यापही हे युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. काही देशांनी छुप्या पद्धतीने तर काही देशांनी उघडपणे पाठिंबा दर्शवला आहे. युक्रेनच्या रहिवाशांनी देखील आता युद्धात उतरण्याची तयारी सुरू केलीय. यासह युक्रेनची सर्वात सुंदर महिला अशी ओळख असणारी अनास्तासिया लेना (Anastasiia Lenna) हिने युक्रेनच्या सैन्यात सहभागी होत रशियाला थेट आव्हान दिलं आहे.

अनास्तानियानं हातात बंदूक घेतलेला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. आमच्या भूमीवर कब्जा करण्याच्या इराद्यानं घुसखोरी करालं तर जीवानिशी जालं असा इशारा तिने आपल्या सोशल मीडिया पोस्टमधून दिला आहे. सध्या युक्रेनच्या या अनास्तासियाची पोस्ट आंतरराष्ट्रीय घडामोडी दरम्यान चर्चेच विषय ठरत आहे.

- Advertisement -

यासह युक्रेनचं सैन्य ज्या पद्धतीने रशियाला लढा देत आहे. ते पाहता नाटोनं युक्रेनमध्ये सहभागी होण्याचा अर्ज करायाला हवा असा टोमणाही तिने लगावला आहे.

- Advertisement -

अनास्तासियाला सर्वाधिक सुंदर महिला म्हणून ओळखले जाते. ती तुर्कस्तानची मॉडेल होती. शिवाय तिने पब्लिक रिलेशन मॅनेजर म्हणूनही काम केल आहे. जर एका अर्थी पाहालाय गेलं तरी अनास्तासियाचा या युद्धाशी दूरदूरचा संबंध नाही. मात्र आपल्या देशवासिंयांचं आणि सैन्याचं स्थैर्य मनोबल वाढवण्यासाठी तिने अशी युक्ती लवढवली आहे. तिने उचलेल्या या पावलाचं सर्व स्तरावरून कौतुक करण्यात येत आहे.

अनास्तासियाने तिच्याप्रमाणेच युक्रेनमधल्या इतरही महिलांना तिने शस्त्र हाती घेण्यास सांगितले आहे. रशियाच्या खासदार केईरा रुदीक यांनीही असाच एक बंदुक घेतलेला फोटो शेअर केलाय. आपल्या देशाच्या रक्षणासाठी शस्त्र हाती घेण्याची वेळ आलीये असा संदेश युक्रेनच्या राष्ट्रध्यक्षांनी दिला आहे. त्यात युक्रेनची नारिशक्ती आघाडीवर आहे.

दरम्यान युक्रेनच्या सैन्यदलात तब्बल 15 टक्के या महिला आहेत. 1993 पासून आपल्या लष्करात महिलांना स्थान देत आहे. सध्या त्यांच्या सैन्यात तब्बल 1100 महिला या लष्करातील महत्वाच्या पदावर आहेत. तर या युद्धाच्या पार्श्वभूमीवर 13 हजार महिला युद्धतळावर तैनात आहेत.

अनास्तासिया सारख्या सुंदरीने हातात बंदूक घेतल्याने सैन्याची शक्ती आणखी वाढली असून आता रशियावर युक्रेन मात करू शकतो की नाही किंवा रशिया युक्रेनला शरणागती घेण्यास भाग पाडतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.


हेही वाचा – Russia-Ukraine War: अमेरिका युक्रेनमध्ये का नाही पाठवत सैन्य? पुतीन यांना घाबरतायत का बायडेन?


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -