घरताज्या घडामोडीसुरक्षा रक्षकानेच पोलीस कर्मचाऱ्याला घातल्या गोळ्या, जम्मू काश्मीरमधील धक्कादायक घटना

सुरक्षा रक्षकानेच पोलीस कर्मचाऱ्याला घातल्या गोळ्या, जम्मू काश्मीरमधील धक्कादायक घटना

Subscribe

जम्मू काश्मीरमधील हंडावार येथील पोलीस कर्मचाऱ्यावर सुरक्षा रक्षकांनी गोळीबार केला आहे.

पोलीस कर्मचाऱ्याला रात्रीच्या वेळीस सुरक्षा रक्षकाने गोळ्या घातल्याची घटना जम्मू काश्मीरमध्ये घटली आहे. पोलीस कर्मचारी एका मंदिरात जाण्याचा प्रयत्न करत होता. मंदिराचा या कर्मचाऱ्याने वारंवार दरवाजा वाजवला सुरक्षा रक्षकाने त्याला ओळख सांगण्यास सांगितले होते. परंतु आपली ओळख न सांगितल्यामुळे हा हल्ला असल्याचे सुरक्षा रक्षकांना वाटले यामुळे पोलीस कर्चमाऱ्यावर गोळीबार करण्यात आला. गोळीबारात पोलीस कर्मचाऱ्याचे निधन झालं आहे. पोलिसांकडून ही घटना दुर्दैवी असल्याचे नमूद केले आहे. सुरक्षा रक्षकांकडून पहिले हवेत गोळीबार करण्यात आला होता. सुरक्षा रक्षकांना हा पोलीस कर्मचारी दहशतवाद्यांना माहिती देणारा वाटला असल्यामुले गोळीबार करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

जम्मू काश्मीरमधील हंडावार येथील पोलीस कर्मचाऱ्यावर सुरक्षा रक्षकांनी गोळीबार केला आहे. अजय धार असं गोळीबारात मृत पावलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रात्रीच्या वेळीस हा पोलीस कर्मचारी एका मंदिराचा दरजावा वाजवत होता. यावेळी सुरक्षा रक्षकांना हल्ला झाला असल्याचे वाटले. सुरक्षा रक्षकांनी पोलीस कर्मचाऱ्याला त्याची ओळख विचारली त्याने ओळख सांगण्यास टाळाटाळ केली. यामुळे सुरक्षा रक्षकांनी दटवण्यासाठी हवेत गोळीबार केला परंतु तरीही ओळख सांगितली नसल्यामुळे अखेर सुरक्षा रक्षकांनी गोळीबार केला. या गोळीबारात पोलीस कर्मचारी अजय धार यांचे निधन झालं आहे. पोलीस कर्मचाऱ्याला सुरक्षा रक्षकाकडून करण्यात आलेली गोळीबाराची घटना दुर्दैवी असल्याचे पोलीसांनी म्हटलं आहे. अशा प्रकारेच सुरक्षा रक्षकांकडून यापुर्वीही सामान्य नागरिकांचा बळी गेला आहे.

- Advertisement -

६ कर्मचाऱ्यांचे निलंबन

जम्मू- काश्मीरमध्ये दहशतवाद्यांची मदत करण्याच्या आरोपाखाली ६ शासकीय कर्मचाऱ्यांना बरखास्त करण्यात आले आहे. यामध्ये २ प्राध्यापक, २ पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे. ज्या कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे त्यांच्यावर दहशतवादी कारवाईमध्ये सहभागी आणि माहिती दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या कर्मचाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.


हेही वाचा : काय सांगता! रेशन दुकानातही काढता येणार पासपोर्ट आणि पॅनकार्ड

- Advertisement -

 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -