घरताज्या घडामोडीचिथावणीखोर वक्तव्यामुळे अभिनेते मिथुन चक्रवर्ती अडचणीत, उच्च न्यायालयाला दिलं स्पष्टीकरण

चिथावणीखोर वक्तव्यामुळे अभिनेते मिथुन चक्रवर्ती अडचणीत, उच्च न्यायालयाला दिलं स्पष्टीकरण

Subscribe

मी पाण्यातील साप नाही कोब्रा आहे. दंश मारुन खेळ खल्लास करेल

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूकीत केलेल्या चिथावणीखोर वक्तव्यामुळे अडचणीत आले आहेत. या वक्तव्यामुळे अभिनेत्याला न्यायालयाची पायरी चढावी लागली आहे. ‘मारुंगा यहां और लाश श्मशान मे गिरेगी’ असे वक्तव्य मिथुन चक्रवर्ती यांनी निवडणूकीच्या प्रचारसेभत केलं होते. याविरोधात न्यायालयात प्रकरण गेलं असून कोलकत्ता उच्च न्यायालयाकडून मिथुन चक्रवर्तींची चौकशी करण्यात आली आहे. टीएमसी सदस्याने मिथुन चक्रवर्ती यांच्याविरोधात मानिकतला पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आली होती.

मिथून चक्रवर्ती यांनी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूकीत भाजपकडून निवडणूक लढवत होते. भाजपने निवडणूकीमध्ये रणशिंग फूंकले होते. मिथुन चक्रवर्तींनी भाषणादरम्यान वादग्रस्त वक्तव्य केलं. मारेल इथे परंतु मृतदेह स्मशानात पडेल असे वक्तव्य मिथुन चक्रवर्ती यांनी केलं होतं. यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. टीएमसीच्या युवा नेत्यानं बंगालच्या मानिकतला पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल केली होती.

- Advertisement -

पश्चिम बंगालच्या विधनासभा निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर बंगालमध्ये हिंसाचार उफाळला होता. या हिंसाचारात २० पेक्षा जणांचा मृत्यू झाला होता. यामध्ये भाजप आणि टीएमसीचे कार्यकर्ते होते. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने भाजप आणि टीएमसीमध्ये चांगलाच वाद रंगला होता. दरम्यान मिथुन चक्रवर्ती यांच्याविरोधातील सुनावणीमध्ये कोलकाता उच्च न्यायालयाने मिथुन चक्रवर्ती यांना आपला ई-मेल पत्ता राज्याला देण्याचे निर्देश दिले. जेणेकरुन बंगाल विधनासभा निवडणुकीच्या वेळी ते चिथावणीखोर विधाने करुन भडकाऊ भाषण केलेल्या तक्रारीविरोधात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चौकशीला उपस्थित राहू शकाल असे निर्देश न्यायालयने दिले आहेत.

मिथुन चक्रवर्ती काय म्हणाले होते

मिथुन चक्रवर्ती यांनी भाषणादरम्यान घोषणा देत डायलॉग मारले होते. मारेल इथं पण मृतदेह स्मशानभूमित पडतील, तसेच त्यांनी म्हटले की हे आता जूनं झाले नवीन डायलॉग मारतो “मी पाण्यातील साप नाही कोब्रा आहे. दंश मारुन खेळ खल्लास करेल” असे म्हटलं होते. मिथुन चक्रवर्ती यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. मानिकतला स्टेशनमध्ये मिथुन यांच्याविरोधात कलम १५३ए,५०४,५०५ आणि १२० बी अंतर्गत तक्रार दाखल करण्यात आली होती.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -