घरताज्या घडामोडीRSS ही कोणतीही सैन्य संघटना नाही तर... मोहन भागवत यांचं मोठं विधान

RSS ही कोणतीही सैन्य संघटना नाही तर… मोहन भागवत यांचं मोठं विधान

Subscribe

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी सैन्यातील संघटनाबाबत महत्त्त्वाचं भाष्य केलं आहे. मोहन भागवत यांनी सांगितलं की, राष्ट्रीय संघ ही एक सैन्य संघटना नाहीये. एका कुटुंबियांप्रमाणे समूह आहे. ग्वालियारमध्ये मध्य भारताच्या प्रांतातील संगीत बॅंडच्या समारोप शिबीरात भागवतांनी संबोधित केलं होतं. यावेळी ते म्हणाले की, RSS ही कोणतीही सेना संघटना नाही. तर एका कुटुंबियांप्रमाणे एक समूह आहे. संघ कुटुंब निर्माण करणारी एक संस्था आहे. संघात संगीत कार्यक्रम होतात. त्यामुळे ती एक संगीत शाळा किंवा व्यायामशाळेसारखं मार्शल आर्ट क्लब नाहीये. संघात एक गणवेश परिधान केला जातो. त्यामुळे ही काही सैन्यांची संघटना वैगेरे नाहीये.

समाज बदलेल तेव्हा देश बदलेल

मोहन भागवत यांनी पुढे म्हटलंय की, संगीत, बौद्धिक यांसारखे कार्यक्रम मनुष्याची गुणवत्ता वाढवते. जेव्हा समाज संपूर्णपणे बदलेल तेव्हा देश बदलेल आणि देशाचं भाग्य बदलायचं असेल तर समजात गुणवत्ता आणणं खूप महत्त्वाचं आहे. संघ अशाच प्रमाणे काम करीत राहीला तर समाजात विश्वास निर्माण होऊ शकतो. भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यामुळे देशाची झालेली नुकसान भरपाई करणं गरजेचं आहे आणि हे काम समाजाचं आहे.

- Advertisement -

आपल्याला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळालं होतं. परंतु यासाठी १८५७ पासून संघर्षाला सुरूवात झाली होती. राजकीय आणि सामाजिक सुधारणेला सूरूवात झाली आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. असं भागवत म्हणाले.

सामान्य नागरिकांमध्ये जागरूकता आणि बदल

देशाला घडवायचं असेल तर आतापासूनच कठीण कार्याला सुरूवात केली पाहीजे. अव्यवस्था आणि देशातील लूट यामुळे देशाचं जे नुकसान झालं आहे. ते भरून काढणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी १० ते २० वर्षाचा कालावधी लागेल. कारण राजकीय नेते, सरकार आणि पोलिसांद्वारे करण्यात येणारं परिवर्तन फक्त काही कालावधीसाठी मर्यादित असतं. यासाठी जर समाजाचा पाठींबा आणि समर्थन मिळत नसेल. तर या परिवर्तनाला महत्त्व नसतं. असे मोहन भागवत यांनी सांगितलं आहे.

- Advertisement -

ग्वालियार मध्ये ४ दिवस सुरू असलेल्या समारोपात ४५० गायक साधकांनी सहभाग घेतला होता. रविवारी संध्याकाळी केदारपूरच्या स्वरस्वती शिशू मंदिराच्या मैदानात त्यांनी संघ प्रमुख आणि लोकांना आपलं प्रदर्शन दाखवलं होतं. यामध्ये सरोद वादक उस्ताद अमजद अली खान यांच्यासोबत सितार वादक उमडेकर, हरप्रीत नामधारी, डॉ. जयंत खोट आणि डॉ. ईश्वरचंद करकरे हे उपस्थित होते.

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -