घरदेश-विदेशअंदमानच्या समुद्रात मान्सून दाखल, राज्यातील 9 जिल्ह्यांना यलो अलर्ट

अंदमानच्या समुद्रात मान्सून दाखल, राज्यातील 9 जिल्ह्यांना यलो अलर्ट

Subscribe

अंदमानच्या समुद्रात नैऋत्य मान्सून दाखल झाला आहे. पुढील 2 दिवसात केरळ किनारपट्टीवर आणि लक्षद्वीपमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

उकाड्याने हैरान झालेल्या सर्वांना सुखावणारी बातमी आहे. अंदमानच्या समुद्रात मान्सून दाखल झाला आहे. तर केरळमध्ये मान्सून २७ मे रोजी धडकण्याची शक्यता आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने ही माहिती दिली आहे

दरवर्षी १ जूनच्या आसपास मान्सून दाखल होतो. पण यंदा आठवडाभर आधीच मान्सून दाखल झाला आहे. अंदमानच्या समुद्रात नैऋत्य मान्सून दाखल झाला आहे. पुढील 2 दिवसात केरळ किनारपट्टीवर आणि लक्षद्वीपमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने कोकण किनारपट्टीसह राज्यातील 9 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात 16 मे ते 19 मे या कालावधी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यांत दोन दिवस विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.  तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बीड या चार जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस होईल.

- Advertisement -

हवामान विभागाने कोल्हापूर, सातारा, सांगली, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर या जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला  आहे.  पश्चिम बंगाल आणि  ईशान्यकडील सात राज्यात पुढील 5 दिवस जोरदार पूर्वमोसमी पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. अंदमान समुद्र आणि अंदमान बेटे आणि पूर्वेकडील बंगालच्या उपसागराच्या काही भागात पुढील २-३ दिवसांत मान्सून पुढे सरकरण्यासाठी अनुकूल वातावरण असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -