घरताज्या घडामोडीCorona उपचारात ५० एकर जमीन गेली, ८ कोटी खर्चूनही मृत्यूशी झुंज अपयशी

Corona उपचारात ५० एकर जमीन गेली, ८ कोटी खर्चूनही मृत्यूशी झुंज अपयशी

Subscribe

कोविड महामारीच्या तिसऱ्या लाटेच्या दहशतीमध्ये एक अतिशय ह्दय पिळवटून टाकणारी घटना मध्य प्रदेशातून समोर आली आहे. एका शेतकऱ्याने कोरोनावरील उपचारावर तब्बल ८ कोटी रूपये खर्च केले, तरीही शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत झाला. मध्य प्रदेशातील रीवा येथील शेतकरी धर्मजय सिंह ( वय ५० वर्षे) यांच्या मृत्यूमुळे एकच हळहळ व्यक्त होत आहे. कुटुंब प्रमुखाला वाचवण्यासाठी कोरोनाच्या उपचारासाठी कुटुंबाने आपली ५० एकर जमीनही विकली, पण २५६ दिवस सुरू असणाऱ्या मृत्यूसोबतच्या झुंजीचा अखेर शेवट झाला. या दरम्यान लंडनच्या डॉक्टरांकडून उपचार घेऊनही शेतकऱ्याला वाचवण्यात अपयश आले.

लंडनहून डॉक्टर उपचारासाठी यायचे भारतात

गेल्या वर्षी एप्रिल २०२१ मध्ये हा शेतकरी कोरोनामुळे संक्रमित झाला होता. त्यानंतर रीवा येथील संजय गांधी हॉस्पिटलमध्ये या रूग्णाला दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यानच तब्येत सातत्याने ढासळली. त्यानंतर कुटुंबाने धर्मजय सिंह यांना थेट एअरलिफ्ट करून चेन्नईच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये भरती केले. त्याठिकाणी जवळपास २५४ दिवस रूग्णावर उपचार सुरू राहिले. या रूग्णाचा उपचार हा लंडनच्या डॉक्टरांच्या देखरेखीत सुरू होता. त्यासाठी लंडनहून डॉक्टर अपोलो हॉस्पिटलला यायचे. या रूग्णाला एक्मो मशीनच्या सपोर्टवर ठेवण्यात आले होते. त्यासोबतच अनेक परदेशी डॉक्टरही रूग्णाला उपचारासाठी सल्ला देत होते.

- Advertisement -

उपचारासाठी कुटुंबाने विकली ५० एकर जमीन

संपूर्ण एक वर्ष चाललेल्या उपचारा दरम्यान त्यांच्या कुटुंबाने ५० एकर जमीन विकली होती. दररोज ३ लाख रूपये या रूग्णावर खर्च होत होते. काही केल्या रूग्णावर उपचार होऊन तो ठीक व्हावा हीच कुटुंबाची अपेक्षा होती. पण अनेक प्रयत्नानंतरही त्यांचा जीव वाचवणे डॉक्टरांना शक्य झाले नाही. धर्मजय सिंह यांच्याकडे १०० एकरहून अधिक जमीन होती. जर कुटुंब प्रमुखच जिवंत राहणार नसेल तर ही जमीन काय कामाची ? याच आशावादावर कुटुंबाने उपचारासाठी मोठा खर्च केला.

एमपी सरकारने केला होता सन्मान

धर्मजय सिंह हे रीवाच नव्हे तर देशातीलही अतिशय नावाजलेले शेतकरी होते. धर्मजय सिंह यांनी स्ट्रॉबेरी आणि गुलाबाच्या शेतीमध्ये विशिष्ट लागवडीमुळे एक वेगळी ओळख निर्माण केली होती. मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी त्यांना २६ जानेवारी २०२१ रोजी सन्मानित केले होते. तर शेतीसोबतच सामाजिक कार्यातही त्यांचा सहभाग होता. कोरोनाच्या काळात लोकांची सेवा करतानाच या शेतकऱ्याला कोरोनाची लागण झाली होती.

- Advertisement -

धर्मराज सिंह यांच्या तब्येतीत गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने सुधारणा होत होती. पण या आठवड्यात सुरूवातीलच त्यांचा रक्तदाब कमी होत गेला. त्यानंतर डॉक्टरांनी पुन्हा एकदा आयसीयूमध्ये उपचार सुरू केले. यादरम्यानच रूग्णाला ब्रेन हॅमरेजही झाला. त्यामुळेच रूग्णाला वेंटिलेटरवर ठेवण्याची वेळ आली. कोरोनावर उपचार घेऊन परिस्थिती सामान्य होत असतानाच त्यांचे एकाएकी निधन झाले. त्यामुळे संपूर्ण कुटुंब हे धक्क्यात असल्याची प्रतिक्रिया धर्मराज सिंह यांचे मोठे बंधू प्रदीप सिंह यांनी दिली.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -