अनंत अंबानी यांचा राधिका मर्चंटसोबत पार पडला साखरपुडा

mukesh ambani son anant ambani engagement with radhika merchant

रिलायन्स उद्योग समूहाचे मालक आणि भारतातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा आज साखरपुडा पार पडला. अंबानी यांच्या मुंबईतील अँटिलिया निवासस्थानी हा साखरपुडा झाला. अनंत आणि राधिका यांनी एकमेकांच्या हातात अंगठी परिधान करत आयुष्याच्या नव्या इनिंगला सुरुवात केली आहे. गुजराती रितीरिवाजाप्रमाणे हा साखरपुडा पार पडला.

यावेळी गुजराती पद्धतीप्रमाणे गोल धना आणि चुनरी विधी झाल्यानंतर साखरपुडा झाला. जुन्या परंपरा कौटुंबिक मंदिरात आणि समारंभाच्या ठिकाणी या विधी दिमाखात पार पडल्या. या कार्यक्रमाला मुकेश अंबानी यांचं संपूर्ण कुटुंब हरज होतं. या साखरपुड्याचे काही फोटो आता माध्यमांसमोर आले आहेत. यामध्ये मुकेश अंबानी पत्नी नीता अंबानी यांच्यासह मुलगा ईशा अंबानी आणि जावई आनंद पीरामलही दिसून आले, यासह त्यांचा थोरला मुलगा आकाश अंबानी आणि सून श्लोकाही दिसत आहे.

गणेश पूजनाने या समारंभाची सुरुवात झाली. यानंतर पारंपारिक लग्न पत्रिकेचे (आगामी लग्नाचे आमंत्रण) वाचन करण्यात आले. यावेळी निती अंबानी यांच्या डान्सने सारखपुड्यात रंगत आणली, नीता अंबानी यांच्या डान्सनं सगळ्यांनाच सुखद धक्का दिला.

कोण आहे राधिका मर्चंट?

राधिका मर्चंट ही एनकोर हेल्थकेअरचे सीईओ वीरेन मर्चंट आणि शैला मर्चंट यांची मुलगी आहे. रधिका आणि अनंत गेली अनेक वर्षे एकमेकांचे मित्र आहेत. 28 वर्षीय राधिका एक ट्रेंड डान्सर आहे. राधिकाने श्री निभा आर्ट्सच्या गुरु भावना ठाकर यांच्याकडून भरतनाट्यम शिकली आहे. राधिका कुटुंब गुजरातमधील कच्छ येथील आहे. 18 डिसेंबर 1994 रोजी मुंबईत जन्मलेल्या राधिकाने तिचे शालेय शिक्षण मुंबईतील ककॅथेड्रल, जॉन कॉनन स्कूल आणि इकोले मोंडियाल वर्ल्ड स्कूलमधून पूर्ण झालं. यानंतर तिने न्यूयॉर्क विद्यापीठातून राजकारण आणि अर्थशास्त्र या विषयात पदवी घेतली. पदवीपर्यंतच्या शिक्षणानंतर राधिका 2017 मध्ये रिअल इस्टेट फर्म Isprava टीममध्ये सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करु लागली, राधिकाला वाचनाची, ट्रेकिंगची आणि पोहण्याची आवड आहे. दरम्यान 2018 मध्ये राधिका आणि अनंत अंबानी यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तेव्हापासून दोघांच्या नात्यावर चर्चा सुरु होत्या आणि आता अखेर दोघांचा साखरपुडा पार पडला आहे.