घरदेश-विदेशदाऊदचा शस्त्र तस्कर मुंबई पोलिसांच्या ताब्यात!

दाऊदचा शस्त्र तस्कर मुंबई पोलिसांच्या ताब्यात!

Subscribe

डी कंपनीचा शस्त्र तस्कर सध्या मुंबई पोलिसांच्या ताब्यात आहे. या शस्त्र तस्कराला अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणांनी अटक केली होती. या तस्कराचे भारतात प्रत्यार्पण व्हावे यासाठी भारतीय सुरक्षा यंत्रणा गेल्या दोन ते तीन वर्षांपासून प्रयत्न करत होती. अखेर भारतीय सुरक्षा यंत्रणेला मोठे यश आले असून डी कंपनीचा हा शस्त्र तस्कर मुंबई पोलिसांच्या ताब्यात आला आहे.

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा शस्त्र तस्कर दानिश अलीली हा मुंबई पोलिसांच्या हाती लागला आहे. अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणांनी १५ नोव्हेंबर २०१८ रोजी दानिशचा ताबा भारतीय सुरक्षा यंत्रणेच्या हाती दिला. दानिशकडून डी कंपनी आणि त्यांच्या कारवायांसंबंधित अधिक माहिती मिळू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. सध्या पोलिसांच्या हाती लागलेल्या दानिशच्या विरोधात भारतात कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल नाही. परंतु, डि कंपनीच्या माहितीसाठी हा दानिश महत्त्वाचा असल्याचे मानले जात आहे. दानिशच्या जीवाला धोका असल्यामुळे त्याच्या अटकेबाबत गुप्तता पाळण्यात आली. तो सध्या गुन्हे शाखेच्या पोलीस कोठडीत आहे.

हेही वाचा – दाऊदला पकडायला अमेरिका मदत करणार

- Advertisement -

अमेरिकेने केले अटक

अमेरिकेने दानिशला २०१४ साली अटक केली होती. दानिशसोबतच अमेरिकेने दाऊदचा पुतण्या सोहेल कासकर याच्यासह दोन पाकिस्तानी नागरिकांना अटक केली होती. या लोकांना अटक करण्यासाठी अमेरिकेकडे ठोस पुरावे नव्हते. त्यामुळे अमेरिकेने व्यूहरचना आखून या चारही जणांना पकडले होते. यासाठी अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणाने एका वेगळ्या पथकाची स्थापना केली होती. हे पथक कोलंबस सरकारच्या विरोधात असल्याचा जाणीवपूर्वक भास करण्यात आला होता. त्यावेळी या पथकाचा संपर्क डी कंपनीशी झाला. या संपर्कामध्ये शस्त्र खरेदी संबंधी बोलणी झाली. सुरक्षा यंत्रणाच्या या पथकाने संपूर्ण माहिती काढून घेतली. त्यानंतर डी कंपनीच्या शस्त्र तस्कराला म्हणजे दानिश आणि त्याच्या साथीदारांना अमेरिकेने अटक केली. या गुन्हेगारांनी १२ सप्टेंबर २०१५ रोजी आपल्या गुन्ह्यांची कबूली दिली होती.

हेही वाचा – दाऊदचा फायनान्स मॅनेजर मोतीला लंडनमध्ये अटक

- Advertisement -

दानिशचे अमेरिकेतून प्रत्यार्पण

अमेरिकेने या चारही आरोपींना दोषी ठरवत अडीच वर्षे जाडा पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, हमीद ख्रिस्ती उर्फ बेनी आणि वाहब ख्रिस्ती उर्फ एंजल या दोघांचा ताबा मिळवण्यासाठी पाकिस्तानी सुरक्षा यंत्रणांनी प्रयत्न सुरु केले. या दोघांचा ताबा मिळवण्यासाठी भारताच्याही सुरक्षा यंत्रणांनी प्रयत्न सुरु केले. अखेर २०१८ मध्ये अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणेने दानिशचा ताबा भारताला देण्याची परवानगी दिली. त्यानुसार १५ नोव्हेंबर २०१८ रोजी दानिशचा ताबा भारतीय सुरक्षा यंत्रणेला मिळाला आणि दानिशचे भारतात प्रत्यार्पण करण्यात आले. त्याचबरोबर सोहेल बाबतही दोन देशांमध्ये सामंजस्यचा करार झाला आहे. त्यामुळे लवकरच दाऊदचा पुतण्या सोहेल देखील भारताच्या सुरक्षा यंत्रणेच्या हाती लागू शकतो.


हेही वाचा – दाऊदला आणखी एक धक्का; हस्तकाला अहमदनगरमधून अटक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -