घरताज्या घडामोडीमाझा भाऊ कपटी, ट्रम्प यांच्यावर बहिणीने केले आरोप!

माझा भाऊ कपटी, ट्रम्प यांच्यावर बहिणीने केले आरोप!

Subscribe

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी बहिण आणि माजी फेडरल जज मॅरिएन ट्रम्प बॅरी यांनी आपल्या भावाला खोटारडा म्हटलं आहे. एका गुप्त रेकॉर्डिंगमध्ये त्या म्हणायला आहेत की, त्यांच्या भावाचा कुठलाही सिद्धांत नाहीये. ट्रम्प यांच्या बहिणीचं हे वक्तव्य त्यांच्या पुतणीनं मेरी ट्रम्प यांना रेकॉर्ड केलं होतं. मेरी ट्रम्प यांनी मागच्या महिन्यात एक पुस्कत प्रकाशित केलं होतं. ज्यात राष्ट्रपती ट्रम्प यांच्यावर टीका करण्यात आली होती.

मॅरिएन यांनी या रेकॉर्डिंगमध्ये म्हटलं आहे की, त्यांना त्याच्या वाह्यात ट्विट आणि खोटारडेपणापासून देवच वाचवेल. ते जे वागत आहेत ते फार क्रूरपणे आहे. मेरी ट्रम्प यांनी म्हटलं आहे की, त्यांनी मॅरिएन यांच हे बोलणं रेकॉर्ड केलं होतं. जेणेकरून कोणत्याही कायदेशीर कारवाईपासून आपण वाचू शकू.

- Advertisement -

राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंप यांनी याबाबत आपलं वक्तव्य दिलंय, जे व्हाईट हाऊसनं प्रसिद्ध केलंय. यात म्हटलं गेलंय की,  ‘प्रत्येक दिवस काही तरी वेगळा असतो, याची कोण काळजी करतं.’ हे रेकॉर्डिंग सर्वात पहिले वॉशिंग्टन पोस्ट वृत्तपत्रानं प्रसिद्ध केलं होतं. त्यानंतर असोसिएटेड प्रेसनं सुद्धा हे छापलं.

त्याचबरोबर या रेकॉर्डिंगमध्ये मॅरिएन ट्रम्प प्रशासनाच्या धोरणावर पण टीका करत आहेत. मेरी ट्रंप यांनी आपली ऑटोबायोग्राफी ‘टू मच अँड नेव्हर इनफ: हाऊ माय फॅमिली क्रिएटेड द वर्ल्ड्स मोस्ट डेंजरस मॅन’ या पुस्तकात अनेक खुलासे केलेल आहेत. मेरी यांनी लिहिलं की, त्यांचे काका डोनाल्ड ट्रंप यांनी स्वत:च्या जागी एसएटी परीक्षा देण्यासाठी आपल्या मित्राला पैसे दिले होते. रेकॉर्डिंगमध्ये बॅरी त्या मित्राचं नाव आपल्याला माहिती असल्याचं म्हटलं आहे.

- Advertisement -

मॅरिएन ट्रम्प यांचे जवळचे संबंध

मॅरिएन यांनी यापूर्वी अनेकदा ट्रम्प यांचं समर्थन केलं आहे. मात्र आता या गुप्त रेकॉर्डिंगमुळे खळबळ माजली आहे. एकदा बॅरी यांनी सांगितलं होतं की, जेव्हा त्या एका ऑपरेशनसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या होत्या. तेव्हा त्यांचा भाऊ त्यांना दररोज बघायला यायचा. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंप या खाजगी घटनांमुळे चर्चेत आणि अडचणीत सापडले आहेत.


हे ही वाचा – मुलगी समजून मुलाशी मैत्री, वैयक्तिक फोटो व्हायरल करण्याची डॉक्टरला धमकी!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -