घरदेश-विदेशकोरोना नाही तर भुताच्या भीतीने गाववाल्यांनी केला लॉकडाऊन

कोरोना नाही तर भुताच्या भीतीने गाववाल्यांनी केला लॉकडाऊन

Subscribe

आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यातील वेनेलावलसा गावात नुकताच ताप येऊन काही लोकांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली. मात्र या घटनेला आता अंधश्रद्धाचे रुप दिले जातेय. मासं खाणाऱ्या पिशाच्चाचे हे काम आहे, अशी भीती आता संपूर्ण गावात पसरली आहे. या पिशाच्चापासून सुटका करण्यासाठी 17 ते 25 एप्रिलपर्यंत गावात कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. इतका कडक लॉकडाऊन कोरोना काळातही लागू करण्यात आला नव्हता. यादरम्यान बाहेरून येणाऱ्या कोणालाही गावात येऊ दिले जात नाही किंवा कोणालाही गावाबाहेर जाऊ दिले जातेय.

हे गाव श्रीकाकुलम जिल्ह्यातील सरुबुज्जिली मंडल अंतर्गत आहे. या गावाची सीमी ओडिशाला लागून आहे. हा लॉकडाऊन वाईट आत्म्यांवर परिणामकारक ठरेल, असा विश्वास गावकऱ्यांचा आहे. यासाठी गावातील सरकारी कार्यालयेही बंद ठेवण्यात आली. गावात कोणीही जाऊ नये म्हणून कुंपण घालण्यात आले. यादरम्यान विविध विभागातील कर्मचारी, वैद्यकीय कर्मचारी आणि शिक्षकांना गावात प्रवेश न नसल्याने शाळा, अंगणवाडी केंद्रही बंद ठेवण्यात आली.

- Advertisement -

गावात वाईट आत्म्यांचा वावर असतो असे ग्रामस्थांचे मत आहे. यासाठी गावातील वडिलधाऱ्यांनी ओडिशा आणि शेजारच्या विजयनगरम जिल्ह्यातील पुजाऱ्यांचा सल्ला घेतला, यावेळी पुजाऱ्यांनी लॉकडाऊनचा पर्याय सुचवला. पुजाऱ्यांच्या सल्ल्यानुसार, गावाच्या चारही दिशांना लिंबू लावले आणि 17 ते 25 एप्रिल दरम्यान लॉकडाऊन लागू करण्यात आला.

याकाळात गावाकडे जाणारा रस्ताही बंद करण्यात आला, तसेच बाहेरच्या लोकांना गावात प्रवेश दिला जाणार नाही. याशिवाय गावात राहणाऱ्यांनी घराबाहेर पडू नये असा इशारा देण्यात आला. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. अनेकांनी या प्रथेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले, तर अनेकांनी त्यावर विश्वास ठेवला.


राज ठाकरेंच्या भोंगा अल्टिमेटमनंतर मुंबई पोलीस अॅक्शन मोडमध्ये; दंगल झाल्यास पाच मिनिटात पोहोचणार

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -