‘रहस्यमय तापा’चा कहर: कोरोनानंतर यूपीमध्ये लहान मुलांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक; ही आहेत लक्षणे

Mysterious viral fever causes havoc in Uttar Pradesh, many districts register deaths
'रहस्यमय तापा'चा कहर: कोरोनानंतर यूपीमध्ये लहान मुलांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक; ही आहेत लक्षणे

देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आली आहे. त्याचप्रमाणे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका बसलेल्या उत्तर प्रदेश राज्यात आता रहस्यमय तापाचा कहर सुरू आहे. पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये या व्हायरल तापाची भीती जास्त पसरली आहे. तापाचा वेग जास्त असल्यामुळे लोकांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. गेल्या काही दिवसांपासून आगरा, फिरोजाबाद, मथुरा, मैनपुरी, एटा आणि कासगंज जिल्ह्यामध्ये ३० हून अधिक लहान मुलांसह ६० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.

या रहस्यमय तापामुळे उत्तर प्रदेशातील परिस्थितीत नियंत्रणाबाहेर जात आहे. तसेच रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे सरकारी रुग्णालयातील बेड्स मिळत नसल्याचे बोलले जात आहे. जीवघेण्या व्हायरल तापाच्या केसेस समोर आल्यानंतर गौतम बौद्ध नगर प्रशासनने हाय अलर्ट जारी केला आहे.

रहस्यमय तापाची लक्षणे

 • तीव्र ताप (१०२ डिग्रीवर)
 • डिहायड्रेशन
 • घसा कोरडा होणे
 • शरीरात सौम्य सूज येणे
 • अचानक प्लेटलेटच्या संख्येत घट होणे

रहस्यमय तापाच्या केसेसमध्ये कोणालाही कोरोना नाही

सध्याच्या काळात थोडा जरी ताप आला तरी डॉक्टर्स सर्वात पहिल्यांदा कोरोना चाचणी करायला सांगतात. अशाच प्रकारे रहस्यमय तापाची लक्षणे दिसल्यावर कोरोना चाचणी करण्यास सांगितले. पण यामध्ये एकही रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळला नाही. याचाच अर्थ ज्यांचे मृत्यू झालेत किंवा जे या रहस्यमय तापामुळे पीडित आहेत, यांच्यामध्ये कोरोना व्हायरस आढळला नाही आहे.

या जिल्ह्यांमध्ये वेगाने पसरतो जीवघेणा ताप

 • गोंडा
 • बस्ति
 • देवरिया
 • बलिया
 • आजमगढ
 • सुल्तानपुर
 • जौनपुर
 • गाजीपुर

अशी घ्या काळजी

 • घर आणि आजूबाजूचा परिसरात साफ करा. एका जागी पाणी साचवू नका.
 • ताजे आणि साधे जेवण जेवा. तसेच जास्त तळलेले पदार्थ खाऊ नका.
 • स्वतः आणि गरम पाणी प्या. दिवसातून कमीत कमी ८ ते १० ग्लास पाणी प्या.
 • ताप आल्यावर तो मोजत राहा आणि चार्ट बनवा.
 • ताप आल्यानंतर प्लेन पॅरासीटामॉल घ्या आणि डॉक्टरकडे जा.
 • विना डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषधं घेऊ नका.
 • भरपूर झोपा.

मुख्यमंत्र्यांनी जारी केले निर्देश

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यांची गंभीर दखल घेतली आहे. ते म्हणाले की, पावसाळ्यात एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरणारे आजार रोखण्यासाठी योग्य पाऊल उचलने गरजेच आहे. त्यामुळे सर्व रुग्णालयात आणि क्लिनिकमध्ये व्हायरल ताप आणि इतर पसरणाऱ्या आजारांची औषधे उपलब्ध असली पाहिजेत. ग्रामीण आणि शहरी भागात सफाई, सॅनिटायझेशन आणि फॉगिंगचे काम सक्रिय राहिले पाहिजे आणि पाणी साचू नये यासाठी विस्तृत व्यवस्था केली पाहिजे.


हेही वाचा – Corona Vaccine: न्युझीलँडमध्ये फायझर लसीमुळे महिलेचा मृत्यू; छातीत जळजळ झाल्याची तक्रार