घरदेश-विदेशनमो पुन्हा सुरु; निवडणूक आयोग काय घेणार भूमिका?

नमो पुन्हा सुरु; निवडणूक आयोग काय घेणार भूमिका?

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उदोउदो करणारा नमो टीव्हीवर विरोधकांकडून अनेक कारवाई केल्यानंतर ते बंद करण्यात आले होते. मात्र, नमो पुन्हा सुरु झाले असून निवडणूक आयोग काय भूमिका घेणार हे पाहाव लागणार आहे.

२०१९च्या लोकसभा निवडणुकांसाठी आचारसंहिता लागू झाल्यानंतर देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उदोउदो करणारा नमो टीव्ही सुरू आहे. यावरून विरोधकांनी मोठा गदारोळ केला. निवडणूक आयोगाकडे आक्षेप देखील नोंदवले. या चॅनलवर कारवाई करण्याची विरोधकांकडून मागणी देखील करण्यात आली. पण आता या प्रकरणातली एक माहिती समोर आली आहे. ‘नमो टीव्ही हा आमच्याच नमो अॅपचा भाग असून, त्याचे प्रक्षेपण टेलीकास्ट न करता वेबकास्ट केले जाते’, असे भाजपने गुरुवारी मान्य केले असून आयोगाच्या या आदेशानंतर एक दिवस सकाळी ते दिसणे बंद झाले होते. मात्र नंतर पुन्हा नमो टीव्ही दिसणे सुरु झाले आहे. त्यामुळे यावर निवडणूक आयोग काय भूमिका घेणार हे पहावे लागणार आहे.

यासाठी नमो टीव्हीने संमती घेतली नाही

नमो टीव्हीच्या लोगोसाठी संमती घेण्यात आली होती. मात्र, त्यावर कोणताही कार्यक्रम, भाषणे मुलाखती दाखवणे, भाषणे आणि मुलाखती यांच्यासाठी आमची समंती घेण्यात आलेली नाही, असे निवडणूक आयोगाच्या दिल्लीतील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

यांनी केली होती तक्रार दाखल

नमो टीव्हीवरील कार्यक्रम हे आचारसंहितेचे उल्लंघन असल्याची तक्रार काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यानुसार आयोगाने बुधावारी काढलेल्या आदेशानुसार नमो टीव्ही दाखवणे गैर होते. तरीही ‘आम्ही कार्यक्रम टेलीकास्ट नव्हे, तर वेबकास्ट करतो आणि त्यासाठी आम्ही स्लॉट विकत घेतला आहे’, असा दावा भाजपने केला आहे. मात्र त्यासाठी डीटीएचचा स्लॉट घेता येतो का? हे स्षष्ट झालेले नाही.

ग्राहकांची संमती न घेता मोफत कार्यक्रम दाखवणेही बेकायदा आहे, असे ग्राहकांचे म्हणणे आहे. मात्र आम्ही स्लॉट घेतला असल्याने त्यावरील कार्यक्रम ग्राहकांना दिसतात, असे भाजपचे म्हणे आहे. आता नमो टीव्हीबाबत निवडणूक आयोग काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

- Advertisement -

वाचा – नमो टीव्ही परवान्याशिवायच सुरू! सरकारला माहितीच नाही!

वाचा – सोशल मीडियावर भाजपने सुरु केले ‘नमो अगेन’ अभियान


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -