घरट्रेंडिंगसोशल मीडियावर भाजपने सुरु केले 'नमो अगेन' अभियान

सोशल मीडियावर भाजपने सुरु केले ‘नमो अगेन’ अभियान

Subscribe

'नमो' असा मजकुर लिहीलेले टीशर्ट, टोप्या, पुस्तक बाजारात आणत निवडणूकीचं बिगुल वाजण्याआधी पासूनचं भाजपने सोशल मीडियावरून प्रचाराला जोरदार सुरवात केली आहे.

सोशल मीडिया आणि इंटरनेचा प्रभावी वापर निवडणूका जिंकण्यासाठी कसा करावा? याचे उत्तम उदाहरण भाजपने प्रस्थापित केले आहे. २०१४ साली याचप्रकारे भाजपने निवडणूक जिंकली. आता २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी सुद्धा मतदारांना आकर्षित करण्यासाठी ‘नमो’ या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर ‘नमो अगेन’ हे अभियान सुरु केले आहे. यामाध्यमातून ‘नमो अगेन’ असे लिहिलेले टीशर्ट, टोप्या, पुस्तक, मोदींचा चेहरा असलेले मास्क, भाजपचे निवडणूक चिन्ह असलेले किचन, कॉफी मग अशा वस्तू मार्केटमध्ये विक्रिसाठी ठेवण्यात आले असल्याचे फोटो टाकण्यात आले आहेत. तसेच ‘बेटी बचावो बेटी पढाओ, स्वछ भारत योजना, मेक इन इंडिया सारखे संदेश या वस्तूंवर लिहून महिला तसेच तरूण मतदारांनां आकर्षित करण्याचा प्रयत्न देखील भाजप करत आहे.

‘नमो’ लिहिलेल्या वस्तु बाजारात ट्रेंड करतायत

२०१४ ची ‘लोकसभा’ निवडणूक भाजपने मोदी लाट आणि सोशल मीडियाच्या जोरावर जिंकली. तोच ट्रेंड पुन्हा वापरत २०१९ साठी भाजपने ‘नमो अगेन’ असा नारा दिला आहे. इंस्टाग्रामच्या ‘नमो’ अकाऊंटवर ‘नमो’ असे लिहिलेले टीशर्ट, टोप्या, पुस्तक, किचेन, देशभक्तीपर संदेश, बाजारात चांगलेच ट्रेंड करत आहेत.

- Advertisement -

‘नमो अगेन’ २०१९ साठी भाजपचा नारा..?

यंदाची ‘लोकसभा’ निवडणूक भाजपासाठी प्रतिष्ठेची लढाई असणार आहे. २०१४ ला ज्याप्रमाणे ‘हरहर मोदी घर-घर मोदी’ असा नारा दिला गेला, तसा २०१९ लोकसभेला ‘नमो’ म्हणजे ‘नरेंद्र मोदी अगेन’ असे स्लोगन असलेला नारा भाजप देत आहे. काही दिवसांपूर्वीच ‘नरेंद्र मोदी’ यांनी ‘नमो’ नावाचं अॅपदेखील लॉंच केले आहे. मोदींच्या उत्कृष्ट भाषण शैली सोबतच सोशल मिडीयाच्या माध्यामातून लोकांच्या सदैव चर्चेत राहायचे, हा राजकीय फंडा भाजपने चांगलाच अवगत केलाय आणि बहुतांशी तो यशस्वी देखील झालाय. एकंदरीतच भाजप यंदाच्या लोकसभा निवडणूकीसाठी ‘नमो अगेन’ चा नारा देत मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे सोशल फंडे आजमावत आहे, असे म्हटले तरी वावगं ठरणार नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -