घरताज्या घडामोडीVideo: मोठं संकट टळलं, उल्कापिंड गेला पृथ्वीच्या जवळून!

Video: मोठं संकट टळलं, उल्कापिंड गेला पृथ्वीच्या जवळून!

Subscribe

जग कोरोना संकटांशी सामना करत आहे. याचदरम्यान पृथ्वीच्या जवळून एक उल्कापिंड जाणार असल्याचं सांगितलं जात होत. ही अंतराळ एक मोठी घटना होती. हा उल्कापिंड पृथ्वीला धडकणार असल्याची शंका वैज्ञानिकांकडून व्यक्त केली जात होती. मात्र असं काहीही न होता हा उल्कापिंड पृथ्वीच्या जवळून गेला असून त्याने पृथ्वीला अजिबात धडक दिली नाही. बुधवारी भारतीय वेळेसनुसार ३ वाजून २६ मिनिटांनी उल्कापिंड पृथ्वीजवळून गेला असून पृथ्वीला याचं नुकसान कुठेही झालं नाही आहे. दक्षिण आफ्रिकेच्या ऑब्जर्वेटरीच्या माहितीनुसार ही अंतराळातील सर्वात घटना समोर आली आहे. ऑब्जर्वेटरीने केलेल्या ट्विटमध्ये सांगितलं आहे की, उल्कापिंड हे एक विनाशकारी होते. याचा व्हिडिओ देखील त्यांनी शेअर केला आहे.

आता अशाप्रकारची घटना २०७९ मध्ये घडू शकते. ऑब्जर्वेटरीमध्ये ८ एप्रिलपासून उल्कापिंडांचं निरीक्षण केलं जात होतं. त्यानुसार ताशी वेग १९,४६१ मिली (३१,३२० किमी/ता) उल्कापिंड वेगाने पृथ्वीच्या जवळून गेला आहे.

- Advertisement -

या उल्कापिंडला एस्टेरायड ११९८ ओआर2 नाव दिले आहे. ११९८ साली उल्कापिंडचा शोध लागला. तेव्हापासून यावर संशोधन सुरू आहे. सूर्याभोवती फिरण्यासाठी १३४४ दिवस लागतात. नैनातालच्या खगोलशास्त्रज्ञ डॉ. शशिभूष पांडे यांनी पहिल्यांदा सांगितलं होत की या अंतराळातील घटनेला घाबरून जाण्याची गरज नाही. कारण हा उल्कापिंड पृथ्वीापासून ६० लाख किलोमीटरपासून दूर जाणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – CoronaVirus: कोरोनाच्या रुग्णांसाठी हर हर महादेव करीत मिडी बस आली धावून


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -