जाणून घ्या ऋषी कपूर यांना झालेला ‘ल्यूकेमिया’ किती धोकादायक आहे?

हा आठवडा भारतीय चित्रपटसृष्टीसाठी दुर्दैवी ठरला आहे.

rishi kapoor
ऋषी कपूर

बॉलिवूडमधील दिग्गज कलाकार ऋषी कपूर यांचं गुरुवारी सकाळी निधन झालं. अनेक दशकं लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ऋषी कपूर यांनी आयुष्याच्या शेवटच्या क्षणांतही डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचार्‍यांचं मनोरंजन केलं. ते दोन वर्षांपासून ल्यूकेमिया आजाराने ग्रस्त होते. हा रोग कर्करोगाचाच एक प्रकार आहे जो आपल्या शरीराच्या त्या भागावर परिणाम करतो ज्यामधून आपल्याला बाह्य संसर्गाविरूद्ध लढायची क्षमता मिळते.

ल्यूकेमिया या अवयवांवर करतो हल्ला

रक्त तयार करणार्‍या ऊतींसह (tissues), अस्थिमज्जा आणि लिम्फॅटिक सिस्टममध्ये होणाऱ्या रोगाला ल्यूकेमिया म्हटलं जातं. शरीरातील पांढऱ्या पेशींमध्ये हा आजार होतो. पांढऱ्या रक्त पेशी रोगांशी लढतात. ल्युकेमिया हा आजार पांढऱ्या पेशींमध्येच होत असल्याने पांढऱ्या पेशी हळूहळू कमी होतात. यामुळे रुग्णाची आजाराशी लढण्याची क्षमता कमी होते.


हेही वाचा – ‘बालकलाकार ते लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड’, असा होता ऋषी कपूर यांचा प्रवास!


ही आहेत सामान्य लक्षणं

कर्करोगाच्या आजाराचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. मायोक्लिनिक वेबसाइटनुसार, हा रोग अनुवांशिक आणि पर्यावरणातील घटकांमुळे होतो. या आजाराच्या सामान्य लक्षणांमध्ये ताप, अशक्तपणा, वजन कमी होणे, प्रत्येक वेळी संसर्ग होणे, जास्त घाम येणे आणि हाडांमध्ये दुखणे यांचा समावेश आहे.

हा आठवडा भारतीय चित्रपटसृष्टीसाठी दुर्दैवी

हा आठवडा भारतीय चित्रपटसृष्टीसाठी दुर्दैवी आहे. कालच इरफान खान यांचा मृत्यू झाला, तर आज चित्रपटसृष्टी पहिले चॉकलेट बॉय ऋषी कपूर यांचं निधन झालं. यामुळे सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.