घरदेश-विदेशNational Cooperative Conference: सहकाराच्या माध्यमातून देशातील गरीब, शोषित, पीडितांचा विकास होईल-...

National Cooperative Conference: सहकाराच्या माध्यमातून देशातील गरीब, शोषित, पीडितांचा विकास होईल- अमित शाह

Subscribe

केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्या नेतृत्त्वात आज देशातील पहिले सहकारी संमेलन सुरु झाले आहे. दिल्लीतील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियमवर या संमेलानाला सुरुवात झाली आहे. देश-विदेशातील कोट्यवधी लोक, सहकारी संस्था ऑनलाईन पद्धतीने या संमेलनात सहभागी झाले आहेत. देशाचे पहिले सहकार मंत्री अमित शाह यांनी यावेळी उपस्थितांना संबोधित केलं. या संमेलनाला संबोधित करताना अमित शाह यांनी देशातील गरीब, शोषित, पीडित समाजासह ग्रामीण क्षेत्राला सहकार व्यवस्थेशी जोडून देशाच्या विकासाला गती देण्यासाठी प्रयत्न करणार असे आश्वासन दिले आहे.

यावेळी भाषणाला सुरुवात करताना अमित शाह यांनी देशातील पहिला सहकारी मंत्री होणं गौरवाची गोष्ट असल्याचे म्हणत देशाचा पहिला सहकार मंत्री म्हणून निवड केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहे.

- Advertisement -

“देशातील सहकार मजबूत करणं हे आपलं ध्येय”

यावेळी बोलताना अमित शाह म्हणाले की,  “देशातील सहकार मजबूत करणं हे आपलं ध्येय आहे, गरिबांचं कल्याण आणि शेवटपर्यंत विकास हे सहकाराशिवाय शक्य नाही. गावांना समृद्ध करणं हे सहकारामुळे शक्य आहे. सह आणि कार्य म्हणजे सहकार आहे. एकदिशेने काम केल्यास गरिबांचं कल्याण शक्य आहे. सहकारामध्ये प्रचंड ताकद आहे, सहकारातून समृद्धी हा मोदींनी नारा दिला आहे, मोदींचं ५ ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्था गाठण्यासाठी सहकार क्षेत्र प्रयत्न करेल.” असे आश्वासन दिले.

“देशाच्या विकासात सहकाराचा खूप मोठा वाटा”

”आज सहकार आंदोलनाला बळ देण्याची, गती देण्याची, दिशा देणं आपल ध्येय आहे. पंतप्रधान मोदींनी या मंत्रालयाची स्थापना केली. आज सहकार मंत्री या नात्याने सांगतो, देशातील सहकार चळवळीतील नेत्यांना कार्यकर्त्यांची विचार करण्याची वेळ संपली असून प्राधान्य देण्याची वेळ सुरु झाली आहे. देशाच्या विकासात सहकाराचा खूप मोठा वाटा आहे. देशाच्या विकासात सहकाराचे मोठे योगदान आजही आहे. मात्र देशातील वेगवेगळ्या टप्प्यांपर्यंत पोहचणं अजूनही बाकी आहे. आपल्याला यावर नव्याने विचार करण्याची गरज आहे. यावर नव्य़ाने आराखडा तयार करण्याची गरज आहे. कामाची गती वाढवावी लागेल. कामात शिस्त, पारदर्शकता आणावी लागेल. याशिवाय कामात सहकारातेच्या भावना स्वभावाप्रमाणे, संस्कारांप्रमाणे आणाव्या लागतील. असे आवाहन अमित शाह यांनी केले.

- Advertisement -

“देशातील गरीब, शोषित, पीडितांचा विकास होईल”

देशातील दलित, शोषित-पीडित, वंचित, गरीब, उपेक्षित महिलांच्या विकासाचा मार्ग केवळ सहकारतेच्या माध्यमातूनचं मिळू शकतो. गरिबांचे कल्याण आणि शेवटपर्यंत विकास हे सहकारतेशिवाय शक्य नाही. गावांना समृद्ध करणं हे सहकारामुळे शक्य होईल. सहकाराच्या माध्यमातून प्रत्येक ग्रामीण भागाला समृद्ध बनवणे, आणि समृद्ध ग्रामीण भागाच्या जोरावर समृद्ध देश घडवणे ही सहकार आंदोलनाची भूमिका आहे. सह आणि कार्य म्हणजे सहकार आहे. एकदिशेने काम केल्यास गरिबांचं कल्याण शक्य आहे. सहकारामध्ये प्रचंड ताकद आहे, सहकारातून समृद्धी हा मोदींनी नारा दिला आहे, मोदींचं ५ ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्था गाठण्यासाठी सहकार क्षेत्र एडी-चोटीचा जोर लावेल असे विश्वास अमित शाह यांनी व्यक्त केला.

”सहकारातून ३ लाख कोटी कुंटुंबांशी जोडले गेलो”

गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, सहकारतेशी ३६ लाख कोटी कुटुंब जोडले गेलेत. सहकार चळवळ गरीब आणि मागास वर्गाच्या विकासासाठी आहेत, असे ते म्हणाले. सहकार भारताच्या संस्कृतीत आहेत, प्रत्येकाला सोबत घेऊन चालावे लागेल. गरीब क्रांतीला नवी दिशा देण्याचे काम इफ्कोने केले. सुरुवातीला ८० शेतकरी अमूल कंपनीशी जोडले गेले. यातून अमूलने जे कार्य केले ते मोठ्या कॉर्पोरेट कंपन्याही करू शकत नाहीत हे दाखवून दिले. आज ३६ लाख शेतकरी अमूलसोबत आहेत. तर लिज्जत पापड देखील सहकारी संस्थांपैकी एक आहे हे फार कमी लोकांना माहित असेल. अमूल आणि लिज्जतच्या यशात देशातील महिलांचे मोठे योगदान आहे.

“सहकारी चळवळीची प्रासंगिकता आजही कायम”

गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, “सहकारी संस्थांना कोणतेही परिपत्रकाची गरज नसते, ते कोणत्याही संकटाच्या वेळी मदत करण्यास तयार असतात. पूर असो, चक्रीवादळे, काहीही झाले तरी ते मदतीसाठी पुढे येतात. सहकारी संस्थांनी आजपर्यंत अनेक चढ -उतार पाहिले आहेत. आज या निमित्ताने मला सहकार आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या सर्व लोकांची आठवण झाली. मला ही चळवळ पुढे नेण्याची इच्छा आहे. सहकारी चळवळीची प्रासंगिकता आजही कायम आहे. असंही अमित शाह म्हणाले. या संमेलनासाठी देशभरातून सहकार क्षेत्राशी संबंधित २ हजार प्रतिनिधी उपस्थित होते. देशातील हे पहिलंच सहकार क्षेत्रातील इतकं भव्य संमेलन आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -