Monday, April 12, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Breaking : बंद दाराआड पवार, शाह, पटेल यांच्यात गुप्त बैठक 

Breaking : बंद दाराआड पवार, शाह, पटेल यांच्यात गुप्त बैठक 

Related Story

- Advertisement -
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्बमुळे महाराष्ट्रातील राजकारण पुरते ढवळून निघाले आहे. याचदरम्यान, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार , माजी केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री प्रफुल्ल पटेल आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यात अहमदाबाद येथे गुप्तभेट झाल्याचे वृत्त दिव्य भास्कर या वृत्तपत्राने दिले आहे. या भेटीनंतर येत्या काही दिवसातच महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे बदलणार असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

दिव्य भास्करच्या बातमीनुसार , पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे काही निवडक ज्येष्ठ नेते शुक्रवारी संध्याकाळी खासगी जेट विमानाने अहमदाबाद येथे गेले होते.  संध्याकाळी सहाच्या सुमारास ते अहमदाबादला पोहचले. त्यानंतर अहमदाबाद  विमानतळावरून हे नेते  थेट शांती आश्रम येथील एका गेस्ट हाऊसवर गेले. त्याठिकाणी अमित शाह हे काही मोजक्या भाजप नेत्यांबरोबर आधीच हजर होते. बंद दाराआड पवार, शहा आणि पटेल यांच्यात गुप्त बैठक झाली. तबब्ल दोन तास ही बैठक सुरू होती. पण त्यात नक्की कोणत्या विषयावर चर्चा झाली ते मात्र कळू शकलेले नाही.

- Advertisement -