घरदेश-विदेशइस्त्रायलचे पंतप्रधान यांचा सप्टेंबरमध्ये भारत दौरा; घेणार पंतप्रधान मोदी यांची भेट

इस्त्रायलचे पंतप्रधान यांचा सप्टेंबरमध्ये भारत दौरा; घेणार पंतप्रधान मोदी यांची भेट

Subscribe

इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू लवकरच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. बेंजामिन नेतान्याहू हे ९ सप्टेंबर रोजी भारत दौऱ्यावर येणार आहे.

इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू लवकरच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. बेंजामिन नेतान्याहू हे ९ सप्टेंबर रोजी भारत दौऱ्यावर येणार आहे. नरेंद्र मोदी यांची नेतान्याहून हे दिल्लीमध्ये भेट घेणार आहेत तर १७ सप्टेंबर रोजी इस्त्रायलमध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नेतान्याहू यांच्या भेटीला महत्व प्राप्त झाले आहे. निवडणुकीतील प्रचाराचा भाग म्हणूनच ही भेट होत असल्याची टीका नेतान्याहू यांच्या विरोधकांकडून केली जात आहे.

जेरुसलेममधील भारतीय दुतावासाला नेतान्याहू यांनी पत्र पाठवून आपल्याला भारतात येण्याचे आमंत्रण द्यावे, अशी विनंती केल्याचेही यॉसी यांनी म्हटले आहे. मिळालेल्या महितीनुसार, भारताने २५ ऑगस्टच्या आठवड्यात मोदी आणि नेतान्याहू भेटीसंदर्भात प्रस्ताव पाठवला होता. मात्र इस्त्रायल सरकारने ही भेट लवकर घडवून आणण्याची विनंती केल्याने अखेर ९ सप्टेंबर रोजी ही भेट होणार आहे.

- Advertisement -

‘नेतान्याहू यांची ही भारत भेट अवघ्या काही तासांची असेल. ते केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतील. या भेटीत कोणतीही महत्वाची बैठक दोन्ही देशांमध्ये होणार नसून भविष्यातील व्यापारसंबंधी बैठकींसंदर्भात या बैठकीत एखादा निर्णय होऊ शकतो,’ अशी माहिती सुत्रांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला दिली आहे. इस्त्रायलमधील निवडणुकाआधी प्रचाराचा भाग म्हणून नेतान्याहू मोदींना भेटणार असल्याचा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.

हेही वाचा –

आयटी कंपनीत काम करणाऱ्या तरुणाची गोळी झाडून आत्महत्या

- Advertisement -

अमेरिकेत इम्रान खान यांना दुय्यम वागणूक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -