घरCORONA UPDATEन्यूयॉर्क बनले करोनाचे केंद्र

न्यूयॉर्क बनले करोनाचे केंद्र

Subscribe

चीन व इटलीनंतर अमेरिकेतील न्यूयॉर्क शहर करोनाचे केंद्र बनले आहे. अमेरिकेत आतापर्ंयत करोनामुळे १००० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तर ६८,५७२ लोकांना करोनाची लागण झाली आहे. या वाढत्या आकड्यामुळे करोनाची सर्वाधिक लागण झालेल्या देशांच्या यादीत चीन, इटलीनंतर अमेरिकेचा तिसरा क्रमांक लागला आहे.

आजच्या माहितीनुसार अमेरिकेत करोनामुळे १०३१ लोकांचा मृत्यू झाला आहे. यात सर्वाधिक मृत्यू न्यूयॉर्क मध्ये झाले आहेत. येथे ३६६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर वॉश्गि्ंटनमध्ये १३३ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) करोनासंदर्भात अमेरिकेला याबद्दल इशाराही दिला होता. यात अमेरिका करोनाचे केंद्र बनू शकते यामुळे योग्य ती खबरदारी घेण्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला होता. तसेच खबरदारी न घेतल्यास अमेरिका दुसरे इटली बनू शकते असे जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रवक्ता मार्गारेट हॅरिस यांनी म्हटले आहे. तसेच अमेरिका सध्यामध्ये करोनाच्या पहील्या स्टेजमध्ये असून लवकरच दुसऱ्या स्टेजमध्ये पोहचू शकते. कारण अमेरिकेच्या अमेर भागात सध्या थंडीचे दिवस असून काही ठिकाणी बर्फ पडत आहे. यामुळे अमेरिकेत करोनाग्रस्तांची संख्या वाढण्याची शक्यता जागितक आरोग्य संघटनेने व्यक्त केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -