घरताज्या घडामोडीमुंद्रा पोर्ट ड्रग्ज प्रकरणात NIAची मोठी कारवाई; २९८८ किलो हेरॉइन जप्त

मुंद्रा पोर्ट ड्रग्ज प्रकरणात NIAची मोठी कारवाई; २९८८ किलो हेरॉइन जप्त

Subscribe

गुजरात येथील मुंद्रा पोर्ट ड्रग्ज प्रकरणात केंद्रीय तपास यंत्रणेने मोठी कारवाई केली आहे. NIAने तब्बल २ हजार ९८८ किलोग्रॅम हेरॉइन जप्त केले आहे. या प्रकरणी मंगळवारी संपूर्ण भारतात अनेक ठिकाणी छापेमारी करण्यात आली. या छापेमारीत अधिकाऱ्यांना काही वस्तू आणि डिजिटल उपकरणे सापडली आहे.

गुजरात राजस्व गुप्तचर विभागाने या प्रकरणी सर्वात पहिल्यांदा गुन्हा दाखल केला होता. ६ ऑक्टोबर २०२१ रोजी हे प्रकरण राष्ट्रीय तपास यंत्रांनाना सोपवण्यात आले होते. या नंतर केलेल्या कारवाईत २ हजार ९८८ किलोग्राम हेरॉइन जप्त करण्यात आले होते.

- Advertisement -

एनआयएच्या अधिकाऱ्यांनी आज दिल्ली, कोलकाता, पंजाब आणि गुजरात राज्यात तपास मोहीम चालवली. एनआईएने दिल्लीतील सम्राट हॉटेलातील प्लेबॉय क्लब परही छापा टाकला आहे. तपासदारम्यान अधिकाऱ्यांना आढळले की, आरोपींनी २०२० आणि २१ मध्ये सर्वाधिक या दगडांची आयात केली होती आणि ही खेप दिल्ली येथे पाठवण्यात आली होती. मात्र, छापेमरीत काही आक्षेपार्ह वस्तू आणि काही डिजिटल उपकरणं आढळली आहेत. या प्रकरणी सध्या तपास सुरू आहे.

दरम्यान, गुजरात हे भारतातील बेकायदा ड्रग्ज तस्करीचं प्रमुख केंद्र बनल्याचं चित्र आहे. कारण गेल्या काही दिवसांमध्ये अनेकदा हजारो कोटी रुपयांचे विविध प्रकारचे ड्रग्ज गुजरातच्या बंदरांवरुन जप्त करण्यात येत आहेत. त्यात पुन्हा एकदा नव्यानं ड्रग्ज पकडण्यात आलं आहे.

- Advertisement -

फेब्रुवारी महिन्यात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आणि भारतीय नौदलाने केलेल्या संयुक्त कारवाईत गुजरातच्या किनारपट्टीवरील एका जहाजातून २ हजार कोटींहून अधिक किमतीचे ७५० किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. तसेच जून महिन्यातील पहिल्या आठवड्यात सुद्धा नऊ पाकिस्तानी नागरिकांसह  २८० कोटी किमतीच्या हेरॉईनची भारतात तस्करी करण्याचा प्रयत्न करताना एटीएसने अटक केली होती.


हेही वाचा : भारत-पाक सागरी सीमेवर आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश; गुजरात पोलिसांकडून 667 माफियांना अटक


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -