घरताज्या घडामोडीनितीश कुमारांनी घेतली राहुल गांधींची भेट, 50 मिनिटाच्या बैठकीत काय घडलं?

नितीश कुमारांनी घेतली राहुल गांधींची भेट, 50 मिनिटाच्या बैठकीत काय घडलं?

Subscribe

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज दिल्लीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे पन्नास मिनिटं चर्चा झाली. बिहारमध्ये काँग्रेससह महाआघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर नितीश कुमार आणि राहुल गांधी यांची ही पहिलीच भेट होती. राहुल गांधींची भेट घेतल्यानंतर नितीश कुमारांनी प्रसार माध्यमांशी संवाद करणे टाळले.

बिहारमध्ये नवे सरकार स्थापन झाल्यानंतर राहुल गांधी यांनी नितीश कुमार यांचे फोनवरून अभिनंदन केले होते. ही बैठक अशा वेळी झाली आहे, जेव्हा रविवारी राहुल गांधींनी भाजपला पराभूत करण्यासाठी एकजुट होण्यासाठी बोलले होते. यावेळी बिहारमध्ये सत्तापरिवर्तन झाल्यानंतर नितीशकुमारही एकत्र येण्याचा सल्ला देत आहेत. नितीश कुमार तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आले आहेत. दिल्लीत पोहोचल्यानंतर नितीश कुमार म्हणाले की, मला पंतप्रधान होण्याची इच्छा नाही. विरोधकांनी एकत्र येऊन भाजपविरोधात लढा द्यावा, एवढीच माझी इच्छा आहे, विरोधक एकत्र आले तर बरे होईल, असं कुमार म्हणाले.

- Advertisement -

दिल्लीला जाण्यापूर्वी नितीश कुमार यांनी राष्ट्रीय जनता दल प्रमुख लालू प्रसाद यादव यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आणि राबडी देवी तेथे उपस्थित होते. नितीश कुमार यांच्या दिल्ली दौऱ्याबाबत उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव म्हणाले की, आज मुख्यमंत्र्यांचा दिल्ली दौरा आहे. ते महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांची भेट घेणार आहेत. विरोधकांना भाजपाविरोधात एकजूट दाखवावी लागणार आहे, असे नितीशकुमार यांनी स्पष्टपणे सांगितले.


हेही वाचा : राजपथ आणि सेंट्रल व्हिस्टा लॉनच्या नावात होणार बदल, देण्यात येणार ‘हे’

- Advertisement -

 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -