ब्रिटनच्या पंतप्रधान लिज ट्रस, भारतासाठी आशेचा किरण

लिज ट्रस यांनी ब्रिटनचे परराष्ट्र मंत्रीपदही भूषवले आहे. तसेच त्यांना राजकारणाचा दांडगा अनुभव असून त्यांची आंतरराष्ट्रीयस्तरावर अनेक बड्या राजकीय नेत्यांबरोबर मैत्रीपूर्व संबंध आहेत. ट्रस या २०१० साली पहील्यांदा ब्रिटीश संसदेच्या सदस्य बनल्या होत्या.

ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत लिज ट्रस यांचा विजय झाला असून भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांचा मात्र पराजय झाला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून ब्रिटनचे नवे पंतप्रधान म्हणून सुनक यांच्या नावाची चर्चा होती. मात्र ब्रिटनने ४७ वर्षीय लिज ट्रस यांनाच पसंती दिली. ट्रस यांना ८१,३२६ मत मिळाली तर सुनक यांना ६०,३९९ मत मिळाली आहेत. पण विशेष म्हणजे सुनक यांच्या पराजयाने ब्रिटनपेक्षा भारतीय जनतेलाच अधिक दुख झाले आहे. कारण ऋषी सुनक हे कट्टर हिंदूत्वादी असून भारतीय समर्थक आहेत. यामुळे ब्रिटनच्या पंतप्रधानपदी त्यांची निवड झाली असती तर त्याचा फायदा दोन्ही देशातील भारतीय जनतेला झाला असता. पण लिज ट्रस ब्रिटनच्या नव्या पंतप्रधान झाल्याने त्याचा भारत ब्रिटन संबंधावर काय परिणाम होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. त्यासाठी लिज ट्रस यांच्या राजकीय प्रवासाबदद्ल जाणून घेणे महत्वाचे आहे.

लिज ट्रस यांनी ब्रिटनचे परराष्ट्र मंत्रीपदही भूषवले आहे. तसेच त्यांना राजकारणाचा दांडगा अनुभव असून त्यांची आंतरराष्ट्रीयस्तरावर अनेक बड्या राजकीय नेत्यांबरोबर मैत्रीपूर्व संबंध आहेत. ट्रस या २०१० साली पहील्यांदा ब्रिटीश संसदेच्या सदस्य बनल्या होत्या. त्यानंतर दोनच वर्षानंतर २०१२ साली पहील्यांदाच त्या शिक्षण मंत्र्याच्या रुपात डेविड कॅमरूनच्या मंत्रिमंडळात सामील झाल्या होत्या. त्यानंतर २०१४ मध्ये त्या पर्यावरण मंत्री झाल्या. २०१५ साली कंझर्टवेटीव्ह कॉन्फ्ररन्समध्ये ट्रस यांनी पनीरवर दिलेल्या भाषणाची जगभऱात खिल्ली उडवली गेली होती.

तर दुसरीकडे ट्रस यांचा भारताप्रती सकारात्मक दृष्टीकोन असून रशिया युक्रेन यु्द्धादरम्यान भारताच्या भूमिकेवर अनेक देशांनी प्रखर टिका केली होती. त्यावर ट्रस यांनी आक्षेप घेतला होता. परराष्ट्र मंत्री असताना एप्रिल महिन्यात लिज ट्रस भारत दौऱ्यावर होता. त्यावेळी त्यांनी भारत ब्रिटनमधील व्यापार, संरक्षण, पर्यावरणासह शिक्षण क्षेत्रात एकत्रित काम करण्याचे समर्थन केले होते. विशेष म्हणजे भारत हा इंडो पॅसिफिकचा पक्का खेळाडू असून मोठी बाजारपेठ असणारा देश आहे. यामुळे ब्रिटनच्या पंतप्रधानपदावर कोणीही नेता आला तरी त्याला भारताबरोबर सुदृढ संबंध ठेवावेच लागतात. त्यातच लिज यांना भारताप्रती विशेष प्रेमही आहे. यामुळे ब्रिटनची अर्थव्यवस्था भक्कम करण्यासाठी लिज ट्रस या भारताबरोबर मुक्त व्यापार संबंध ठेवण्यासही इच्छुक आहेत. त्यासाठी दोन्ही देशात लवकरच द्विपक्षीय करार होण्याची शक्यता आहे. हा करार झाल्यास भारत ब्रिटनमध्ये २०३५ पर्यंत वर्षाला २८ अरब पौंडपर्यंत व्यापार विस्तार होईल. गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे तत्कालिन पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यात युके व्यापारी संबंधांवर सहमतीही दर्शवण्यात आली होती. दोन्ही देशांमध्ये व्यापार, आरोग्य, पाणी, संरक्षण क्षेत्रात एकत्र काम करण्यावर प्राथमिक चर्चाही झाली होती. यामुळे ट्रस यांची ब्रिटनच्या पंतप्रधानपदी झालेली निवड ही भारतासाठी सकारात्मक असेल.

तसेच सुनक यांच्या पराजयामुळे भारत ब्रिटन यांच्यातील व्यापारी संबंधांवर कसलाही परिणाम होणार नाही. सुनक हे भारतवंशीय जरी असले तरी ते ब्रिटीश नागरिक आहेत. यामुळे साहजिकच त्यांचे प्राधान्य भारताच्या फायद्यापेक्षा ब्रिटनचा फायदा करून देण्यात आहे. यामुळे त्यांच्या पराजयाचा परिणाम भारतार नक्कीच होणार नाही. असे तज्त्रांनी म्हटले आहे.