घरताज्या घडामोडीधक्कादायक! अपघातातून वाचले बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, सुरक्षा रक्षकांची धावपळ

धक्कादायक! अपघातातून वाचले बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, सुरक्षा रक्षकांची धावपळ

Subscribe

सुरक्षा रक्षक मुख्यमंत्र्यांच्या गाडीपर्यंत धावत गेले. परंतु गाडी कशीबशी वरच्या बाजूला गेली आणि अधिकाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. मुख्यमंत्री नितीशकुमार पुढच्या कार्यक्रमाला मार्गस्थ झाले.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार बुधवारी पुन्हा एकदा अपघातातून वाचले आहेत. नितीश कुमार यांची गाडी अपघातग्रस्त होण्यापासून वाचली. मुख्यमंत्री नितीश कुमार छट घाटचे निरीक्षण करत होते. यावेळी एका पाटीलपुल घाटावर पोहचले आणि तयारी पाहून कामाचे कौतुक केलं. मुख्यमंत्री पाहणी करणार असल्यामुळे अधिकारीसुद्धा मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. पाटीलपुल घाट पाहिल्यानंतर गंगा सेतुच्या दिशेना जाताना गाडी स्लो झाली. असं वाटलं की गाडी मागच्या दिशेने पडेल परंतु असा अपघात होण्यापासून वाचला आहे.

मुख्यमंत्री नितीश कुमार छठ घाटची पाहणी करत होते. राम सेतुच्या दिशेने वरच्या भागावर गाडी जात होती. परंतु गाडी पुढे जाता जाता स्लो झाली आणि पुन्हा मागे येईल अशी परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु सुरक्षा रक्षक मुख्यमंत्र्यांच्या गाडीपर्यंत धावत गेले. परंतु गाडी कशीबशी वरच्या बाजूला गेली आणि अधिकाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. मुख्यमंत्री नितीशकुमार पुढच्या कार्यक्रमाला मार्गस्थ झाले.

- Advertisement -

यापूर्वी झाली होती दुखापत

मुख्यमंत्री नितीश कुमार यांना १५ ऑक्टोबर रोजी पाहणी करताना जखम झाली होती. स्टीमरचे निरीक्षण करताना ही जखम झाली होती. पोटावर जखम झाली असल्याची माहिती नीतीश कुमार यांनी सांगितले. तसेच कुर्ता उचलूनसुद्धा त्यांनी पोटावर असलेली जखम दाखवली. या जखमेमुळे ते गाडीच्या पुढच्या सीटवर बसू शकत नाही असेही त्यांनी सांगितले.


हेही वाचा : जग काय विचार करतं याने फरक पडत नाही, प्रियंका गांधींची सोनियांसाठी भावूक पोस्ट

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -