घरताज्या घडामोडीजग काय विचार करतं याने फरक पडत नाही, प्रियंका गांधींची सोनियांसाठी भावूक...

जग काय विचार करतं याने फरक पडत नाही, प्रियंका गांधींची सोनियांसाठी भावूक पोस्ट

Subscribe

प्रियंका गांधी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, आम्हाला तुझा नेहमी अभिमान वाटतो. जग काय विचार करतं किंवा काय म्हणेल याने काही फरक पडत नाही. तु आम्हाला नेहमी आमच्यावर प्रेम केलं हे आम्हाला माहिती आहे.

काँग्रेसमध्ये नव्या पर्वाला सुरुवात झाली आहे. पक्षाची जबाबदारी मल्लिकार्जून खरगे यांना देण्यात आली आहे. मावळत्या काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासाठी प्रियंका गांधी वड्रा यांनी भावूक पोस्ट केली आहे. जग काय विचार करतं याने फरक पडत नाही. तु कायमच आम्हाला सर्वांना प्रेम दिलं अशी पोस्ट प्रियंका गांधी यांनी केली आहे.

राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा पदभार मल्लिकार्जून खरगे यांनी स्वीकारला. दिल्लीतील काँग्रेसच्या मुख्यालयात हा कार्यक्रम पार पडला यावेळी मावळत्या अध्यक्षा सोनिया गांधी उपस्थित होत्या. राहुल गांधीसुद्धा उपस्थित होते. या कार्यक्रमात काँग्रेसला नव्या धोरणानुसार पुढे नेण्याची जबाबदारी खरगे यांनी स्वीकारली आहे. परंतु प्रियंका गांधी यांनी केलेल्या पोस्टमुळे चर्चा सुरु झाली आहे. प्रियंका गांधी यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट केली आहे. या फोटोमध्ये सोनिया गांधी दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांचा फोटो घेऊन असल्याचे दिसत आहे.

- Advertisement -

प्रियंका गांधी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, आम्हाला तुझा नेहमी अभिमान वाटतो. जग काय विचार करतं किंवा काय म्हणेल याने काही फरक पडत नाही. तु आम्हाला नेहमी आमच्यावर प्रेम केलं हे आम्हाला माहिती आहे. अशा आशयाची पोस्ट प्रियंका गांधी यांनी केली आहे. पक्षाची जबाबदारी मल्लिकार्जून खरगे यांच्यावर सोपवल्यानंतर प्रियंका गांधी यांनी भावनिक पोस्ट केली आहे.

 

- Advertisement -

राहुल गांधींच्या मंत्रानुसार पुढे जाऊ

खरगे म्हणाले की, आपल्या सगळ्यांना मिळून एक भारत निर्माण करायचा आहे. जिथे सगळ्यांसाठी समान अधिकार असेल. सगळ्यांना सन्मान मिळेल. रोजगार मिळेल, महागाई कमी होईल. जेव्हा काँग्रेस कार्यकर्ते आपल्यामधील भीती दूर करेल तेव्हा मोठी ताकदसुद्धा आपल्यासमोर झुकेल. यावेळी खरगेंनी राहुल गांधींची आठवण सांगितली. राहुल गांधी नेहमी सांगतात जेव्हा संकट येईल तेव्हा घाबरु नका ते नेहमी सांगतात की घाबरु नका हेच वाक्य आपण पुढे घेऊन जायचे आहे असे खरगे भाषणादरम्यान म्हणाले.


हेही वाचा : नव्या काँग्रेस अध्यक्षांच्या भाषणातील १० मोठे मुद्दे, २१ मिनिटांच्या भाषणात १० वेळा राहुल-सोनियांचा उल्लेख

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -