घरCORONA UPDATECoronaVirus: दिलासादायक! गोवा झाला कोरोनामुक्त

CoronaVirus: दिलासादायक! गोवा झाला कोरोनामुक्त

Subscribe

गोव्यामध्ये आताच्या घडीला एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण नसल्याची माहिती गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली आहे.

सर्वत्र कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येच्या बातम्या येत असतानाच गोव्यातून मात्र एक दिलासादायक माहिती आली आहे. गोव्यामध्ये आताच्या घडीला एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण नसल्याची माहिती गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी एका व्हिडिओद्वारे दिली आहे. त्यामुळे गोवा आता कोरोनामुक्त झाला आहे, असे म्हणायला हरकत नाही. मात्र केंद्राने घोषित केल्यानुसार ३ मेपर्यंत गोव्यातही लॉकडाऊन असणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

- Advertisement -

काय म्हणाले मुख्यमंत्री प्रमोद सावंत 

मी सर्व हॉस्पिटलमधील टिमला धन्यवाद देतो आणि त्यांचे अभिनंदन करतो की त्यांनी सर्व रुग्णांची व्यवस्थित काळजी घेऊन त्यांच्यावर उपचार केले. गोव्यात एकूण ७ कोरोनाबाधित होते. ज्यापैकी ६ हे परदेशातून आले होते तर एक हा कोरोनाबाधिताचा भाऊ असल्याने त्याला लागण झाली. ते सर्व रुग्ण क्वारंटाइनमध्ये राहून निगेटिव्ह रिपोर्ट आल्यानंतर आता घरी गेले आहेत. तर एकाला उद्या क्वारंटाइन सेंटरला पाठवले जाणार आहे, ज्याचा रिपोर्टही निगेटिव्ह आला आहे. या यशामागे सर्व यंत्रणांचे योगदान आहे. आरोग्य विभाग, पोलीस यंत्रणा, प्रशासन सर्वांनी योग्यरित्या कामगिरी बजावल्याने हे शक्य झाले आहे. पोलिसांनी जागोजागी चोख व्यवस्था ठेवली. आरोग्य खात्याने घरोघरी जाऊन लोकांची तपासणी केली. आजही गोव्यातील सर्व प्रवेशद्वार बंद ठेवण्यात आले आहेत. गोव्यात कोणताही बाहेरचा व्यक्ती येऊ शकणार नाही. त्यामुळे आता गोव्यात कोरोनाचा आकडा शून्य असल्याचे जाहीर करू शकतो. मात्र तरीही केंद्राने घोषित केल्यानुसार ३ मेपर्यंत गोव्यातही लॉकडाऊन असणार आहे. गोव्यातील नागरिकांनी ३ मेपर्यंत असेल सरकारला सहकार्य करावे, ही अपेक्षा, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे.

हेही वाचा –

Lockdown : मुंबईत कोरोनाबाधित क्षेत्र वगळून बांधकाम सुरू करण्यास परवानगी!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -