घरताज्या घडामोडीशालेय विद्यार्थ्यांनी घरीच बनवले आकर्षक मास्क!

शालेय विद्यार्थ्यांनी घरीच बनवले आकर्षक मास्क!

Subscribe

सायन येथील शिव शिक्षण संस्थेच्या डी. एस. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी घरच्या घरी कापडी मास्क बनवले आहेत.

सध्या बाजारामध्ये मास्क उपलब्ध नसल्याची ओरड मोठ्या प्रमाणात करण्यात येत होती. त्यावर कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी घरातल्या स्वच्छ कापडांपासूनही मास्क बनवता येऊ शकतात, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. मुख्यमंत्र्यांच्या या आवाहनाची दखल घेत सायन येथील शिव शिक्षण संस्थेच्या डी. एस. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी घरच्या घरी कापडी मास्क बनवले आहेत. या मास्कवर विद्यार्थ्यांनी रंगबिरंगी चित्रे काढल्याने ती अधिक आकर्षक दिसत आहेत.

- Advertisement -

कोरोनामुळे संचारबंदी असली तरी डी. एस. हायस्कूल सोशल मीडिया तसंच ई-लर्निंग तंत्रज्ञानाचा अवलंब करुन विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाचे तसेच कला साक्षरतेचे विविध उपक्रम राबवत आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत सोशल मीडियाच्या माध्यमातून शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये कला साक्षरता तसेच दृष्य कला भान विकसित करण्यासाठी कार्यरत असलेल्या ‘चित्रपतंग कलासमूहा’ने विद्यार्थ्यांना घरातल्या कापडापासून मास्क बनवण्याचा गृहपाठ दिला होता. विद्यार्थ्यांनी रुमालापासून तसेच कापडाच्या तुकड्यांपासून स्वत: साठी आणि घरातील व्यक्तींसाठी मास्क बनवले. या मास्कवर विद्यार्थ्यांनी चित्रे काढून, त्यावर सामाजिक संदेश लिहिले आहेत. त्यामुळे ते मास्क अधिक आकर्षक बनवले असल्याची माहिती चित्रपतंगच्या संचालिका प्राची श्रीनिवासन यांनी दिली. डी. एस. हायस्कूलतर्फे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच प्रयत्न केले जातात. त्याला सामाजिक जोड ही देण्याचा प्रयत्न शाळेकडून करण्यात येत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव वाढीस लागण्यास मदत होईल, असा विश्वासही श्रीनिवास यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -