घरदेश-विदेशअभिजित बॅनर्जींना वाटतंय, देशात सक्षम विरोधी पक्ष नाही!

अभिजित बॅनर्जींना वाटतंय, देशात सक्षम विरोधी पक्ष नाही!

Subscribe

नोबेल पुरस्कार विजेते अर्थतज्ज्ञ अभिजित बॅनर्जी यांनी जयपूर साहित्य महोत्सवात बोलताना व्यक्त केलेल्या भूमिकेवर सध्या देशात चर्चा सुरू झाली आहे. हे वक्तव्य अभिजित बॅनर्जी यांच्याकडून आल्यामुळे त्यावर जास्त चर्चा होऊ लागली आहे. अभिजित बॅनर्जींच्या मते देशात सक्षम विरोधी पक्ष नाहीये. त्यासोबतच यासाठी त्यांनी सत्ताधारी भाजपला देखील जबाबदार धरलं आहे. त्यामुळे अप्रत्यक्षपणे बॅनर्जी यांनी भाजप आणि काँग्रेस या दोन्ही प्रमुख राष्ट्रीय पक्षांसोबतच इतर विरोधी पक्षातील प्रादेशिक आणि स्थानिक पक्षांना देखील टार्गेट केलं आहे.

काय म्हणाले अभिजित बॅनर्जी?

अभिजित बॅनर्जी म्हणाले, ‘सक्षम विरोधी पक्ष हे देशातील लोकशाहीचं ह्रदय असतं. पण सध्या देशाला सक्षम विरोधी पक्षाची गरज आहे. शिवाय सत्ताधारी पक्षाने देखील याची काळजी घेतली पाहिजे की देशात विरोधी पक्ष सक्षम राहावा. जेणेकरून सत्ताधाऱ्यांवर वचक राहील.’

- Advertisement -

दरम्यान, यावेळी बोलताना बॅनर्जी यांनी देशातल्या शिक्षण व्यवस्थेविषयी देखील भूमिका मांडली. ‘देशातल्या मुलांची अवस्था ज्या भाषची माहिती नाही, अशा भाषेतला सिनेमा पाहाताना होते तशी झाली आहे. खरंतर मुलांना ज्या विषयात रस आहे, तोच विषय त्यांना समजतो. त्यामुळेच जे त्यांना समजतं, तेच आपण शिकवायला हवं’, असं ते म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -