…सहमतीशिवाय शारीरिक संबंध, कर्नाटक उच्च न्यायालयाने फेटाळले बलात्काराचे आरोप

karnataka hijab row karnataka high court defers hearing till tomorrow
Hijab Row : हिजाब प्रकरणावरील कर्नाटक उच्च न्यायालयातील सुनावणी उद्यापर्यंत तहकूब

नवी दिल्ली : एका खटल्याच्या सुनावणीदरम्यान कर्नाटक उच्च न्यायालयाने आज महत्त्वपूर्ण टीप्पणी कतराना म्हटले की, इच्छेशिवाय ५ वर्षे शारीरिक संबंध ठेवताच येत नाही, त्यामुळे महिलेने केलेले बलात्काराचे आरोप न्यायालयाने फेटाळून लावले आहेत. लग्नाचे वचन देऊन शारीरिक संबंध ठेवले आणि नंतर काही कारणाने लग्न होऊ शकले नाही, तर त्याला बलात्कार म्हणता येणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

मिळालेल्या माहितीनुसार कर्नाटकातील एका महिलेचे तरुणासोबत गेल्या ५ वर्षांपासून प्रेमसंबंध होते. त्यातून दोघांनी अनेकदा शारीरिक संबंध ठेवले. मात्र काही काळानंतर या दोघांमध्ये वाद झाला आणि तरुणाने महिलेसोबत लग्न करण्यास नकार दिला. तरुणाने लग्नास नकार दिल्यानंतर महिलेने तरुणाविरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आणि हे प्रकरण कोर्टात गेले. संबंधित तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून तिचे लैंगिक शोषण केले आणि तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याचा आरोप पीडित तरुणीने केला होता.

दरम्यान या प्रकरणात आज कर्नाटक उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. या सुनावणीत कर्नाटक उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण टिपण्णी करताना म्हटले की, महिलेच्या इच्छेशिवाय सलग ५ वर्ष शारीरिक संबंध ठेवताच येत नाहीत. त्यामुळे पीडित तरुणीने केलेले सर्व आरोप न्यायालयाने फेटाळून लावले आहेत.

न्यायमूर्ती एम नागप्रस्न्ना यांनी आज निकाल देताना म्हटले की, महिलेची संमती एकदा, दोनदा, काही दिवसांसाठी आणि महिन्यांसाठी घेतली नाही, तर पूर्ण ५ वर्षांसाठी घेतली नाही असे दिसून येत आहे. मात्र, तरुणाने महिलेच्या संमतीशिवाय शारीरिक संबंध ठेवले आहेत. ५ वर्षे एकमेकांसोबत ओळख आणि या काळात दोघांमध्ये निर्माण झालेले संबंधामुळे महिलेने केलेल्या ३७५ आणि ३७६ कलमांनुसार गुन्हा मानता येणार नाही. आयपीसी च्या कलम ३७५ नुसार महिलेच्या संमतीविरुद्ध लैंगिक संबंध बलात्कार मानला जातो आणि त्यासाठी कलम ३७६ नुसार बलात्कारासाठी शिक्षा केली जाते. मात्र या प्रकरणात असे दिसून येत नसल्यामुळे न्यायालयाने पीडित महिलेचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.