फोन टॅपिंग प्रकरण,  NSE च्या चित्रा रामकृष्ण यांना अटक, संजय पांडेविरोधातही ईडीकडून गुन्हा दाखल

 फोन टॅपिंगप्रकरणी   NSE एनएसईच्या माजी व्यवस्थापकीय संचालिका चित्रा रामकृष्ण यांना ईडीतर्फे अटक करण्यात आली आहे.

it raid income tax department raids premises of former nse md ceo chitra ramkrishna mumbai officials

फोन टॅपिंगप्रकरणी   NSE एनएसईच्या माजी व्यवस्थापकीय संचालिका चित्रा रामकृष्ण यांना ईडीतर्फे अटक करण्यात आली आहे. चित्रा यांना अटक केल्यानंतर न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना चारदिवसाची ईडी कोठडी सुनावली. दरम्यान, याचप्रकरणी ईडीने मुंबईच्या माजी पोलीस आयुक्तांसह एनएसईच्या माजी अधिकाऱ्यांविरोधात आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

ज्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यांच्यात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे आणि एनएसईचे एकेकाळचे टॉप अधिकारी असलेल्या रवि नारायण यांचाही समावेश आहे. केंद्रीय तपास यंत्रणेने या सगळ्यांच्याविरोधात पीएमएलए अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयनेही गेल्या आठवड्यात याप्रकरणाशी संबंधित गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयने केलेल्या आरोपानुसार नारायण आणि रामकृष्ण यांनी मुंबईचे सेवानिवृत्त पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या एका कंपनीला शेअर बाजारातील कर्मचाऱ्यांचे फोन कॉल बेकायदेशीररित्या टॅप करण्याचे काम दिले होते.

हे वाचा-NSE SCAM- घोटाळे रोखण्यासाठी बनवण्यात आलेल्या NSE मध्येच घोटाळा,वेदांचा ईमेल आयडी

तसेच सीबीआय आणि आता ईडीने महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे,त्यांची दिल्लीतील कंपनी, एनएसईच्या माजी व्यवस्थापकिय संचालिका चित्रा रामकृष्ण, रवि नारायण, कार्यकारी उपाध्यक्ष रवि वाराणसी आणि एनएसईचे हेड महेश हल्दीपूर यांनाही सहआरोपी केले आहे.

दरम्यान, या प्रकरणात  एक ज्येष्ठ पत्रकारदेखील ईडीच्या रडारवर असून संजय पांडे यांच्याशी संबंधित एका कंपनीला देण्यात आलेल्या कंत्राटाची चौकशी करताना,  पत्रकाराचे नाव समोर आले आहे . असे  इंडिया टुडेने म्हटले आहे.