घरदेश-विदेशनुपूर शर्माला मिळाला पिस्तुलाचा परवाना, कारण...

नुपूर शर्माला मिळाला पिस्तुलाचा परवाना, कारण…

Subscribe

Nupur Sharma | जून २०२२ मध्ये एका टीव्ही शोमध्ये भाजपाच्या तत्कालीन प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याविषयी वादग्रस्त टीप्पणी केली होती. यावरून देशभरात कल्लोळ माजला होता. याचे पडसाद आखाती देशांतही उमटले होते.

Nupur Sharma | नवी दिल्ली – प्रेषित मोहम्मद यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नुपूर शर्मा यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दिल्ली पोलिसांनी त्यांना पिस्तुलाचा परवाना दिला आहे. नुपूर शर्मा यांच्याविरोधात देशभरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत. तसंच, त्यांना अनेकांनी जीवे मारण्याच्याही धमक्या दिल्या आहेत. त्यामुळे स्वसंरक्षणासाठी हा परवाना देण्यात आला आहे.

हेही वाचा नुपूर शर्माच्या अटकेला स्थगिती, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

- Advertisement -

जून २०२२ मध्ये एका टीव्ही शोमध्ये भाजपाच्या तत्कालीन प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याविषयी वादग्रस्त टीप्पणी केली होती. यावरून देशभरात कल्लोळ माजला होता. याचे पडसाद आखाती देशांतही उमटले होते. त्यामुळे नुपूर शर्मा यांचे प्रवक्तेपद काढून घेत त्यांना भाजपामधून हकलण्यात आले होते. दरम्यान, नुपूर शर्मा यांच्याविरोधात देशभरातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. हे सर्व गुन्हे एकाच ठिकाणी वर्ग करण्यात आले. तसंच, सर्वोच्च न्यायालयाने त्यांची अटक रोखली. देशात नुपूर शर्मा यांच्यामुळे वादंग निर्माण झाला आहे. नुपूर शर्मांनी या प्रकरणी एकदाही देशाची माफी मागितली नाही, असंही सर्वोच्च न्यायालायने नोंदवलं होतं.

हेही वाचा – …तर ओवैसींना माफी मागायला का सांगत नाही? नुपूर शर्मा प्रकरणावरून राज ठाकरेंचा ओवैसी बंधूंवर हल्लाबोल

- Advertisement -

काय आहे प्रकरण?

भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी एका चॅनेलच्या कार्यक्रमात पैगंबर मोहम्मद यांच्याविरोधात वक्तव्य केलं होतं. या वक्तव्याचा पडसाद संपूर्ण देशभर पसरले. एवढेच नव्हे तर आखाती देशातही नुपूर शर्मासह संपूर्ण भारताविरोधात रोष व्यक्त केला गेला. नुपूर शर्मा यांच्याविरोधात वाढता रोष लक्षात घेता भाजपने त्यांची पक्षातून हकालपट्टी केली. दरम्यान, याप्रकरणी सर्वोच्च न्यायालायानेही नुपूर शर्मा यांना फटकारले होते. तुमच्यामुळे देशाची बदनामी झाली असून सर्वांसमोर देशाची माफी मागा असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं होतं.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -