घरदेश-विदेशनुपूर शर्मांचे समर्थन करणाऱ्या टेलरची तलवारीने गळा चिरून हत्या, व्हिडीओ व्हायरल

नुपूर शर्मांचे समर्थन करणाऱ्या टेलरची तलवारीने गळा चिरून हत्या, व्हिडीओ व्हायरल

Subscribe

राजस्थानमधील उदयपूर येथे नुपूर शर्माचे समर्थन करणाऱ्या टेलरची दिवसाढवळ्या तलवारीने गळा चिरुन हत्या करण्यात आल्याची भयंकर घटना घडली आहे. हल्लेखोरांनी या घटनेचा व्हिडीओ पोस्ट करत हत्येची जबाबदारी स्विकारली आहे. कन्हैयालाल तेली (४०) असे मृत टेलरचे नाव आहे. कपडे शिवण्याच्या बहाण्याने दोन व्यक्ती दुकानात आल्या होत्या. त्यानंतर त्यांनी कन्हैया लालवर तलवारीने सपासप वार करत त्याचा गळा चिरला. यात कन्हैयालालचा सहकारीही जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी दोनजणांना अटक करण्यात आली आहे.

- Advertisement -

दहा दिवसांपूर्वी कन्हैयालाल याने सोशल मीडियावर नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ  एक पोस्ट शेअर केली होती. हल्लेखोरांनी त्याच रागातून ही हत्या केल्याचे समोर आले आहे. कन्हैयालाल याच्यावर हल्ला करतानाचा व्हिडीओ हल्लेखोरांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्यात कन्हैयालाल या दोघांना आपल्याला सोडून द्या अशी विनवणी करताना दिसत आहे. तर दुसरीकडे कन्हैयालालच्या हत्येची जबाबदारी घेत असल्याचे दोघे ह्ल्लेखोर सांगत असून पंतप्रधान मोदींनाही जीवे मारणार असल्याची धमकी या दोघांनी व्हिडीओमध्ये दिली आहे.

या घटनेनंतर उदयपूर येथील व्यापाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून या घटनेच्या निषेधार्थ येथे दुकान बंद ठेवण्यात आली. कन्हैयालालने नुपूर शर्माला पाठींबा देणारी पोस्ट केल्यापासून त्याला अज्ञाताकडून जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात येत होत्या. येथील मुस्लीम समाजानेही कन्हैयाच्या पोस्टवर नाराजी व्यक्त केली होती.यामुळे कन्हैयालालने गेले दहा दिवस दुकान बंद ठेवले होते. प्रकरण निवळल्याचे समजून त्याने आज सकाळी दुकान उघडले. त्यानंतर त्याची हत्या करण्यात आली. या घटनेनंतर मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी जनतेला शांत राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच या घटनेचा त्यांनी निषेध व्यक्त केला आहे.

- Advertisement -

 

Kavita Joshi - Lakhehttps://www.mymahanagar.com/author/lkavita/
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -