घरताज्या घडामोडीOla S1 Electric Scooter अखेर भारतात लॉंच, जाणून घ्या, किंमत अन् फीचर्स

Ola S1 Electric Scooter अखेर भारतात लॉंच, जाणून घ्या, किंमत अन् फीचर्स

Subscribe

बहुप्रतिक्षित अशी ओला इलेक्ट्रिक अखेर भारतात लॉंच झाली आहे. भारतातील पहिली स्कुटर ही S1 नावाने ओळखली जाणार आहे. यापुढच्या काळात ओला स्कुटरचे Ola S1 pro यासारखे आणखी व्हेरीयंट पहायला मिळतील. Ola S1 Electric Scooter भारतात दहा रंगांमध्ये उपलब्ध होणार आहे. आपल्या घरगुती सॉकेटच्या मदतीने या स्कुटरला चार्जिंगचा पर्याय आहे हे विशेष.

- Advertisement -

चार्जिंगसाठी किती वेळ लागणार ?

Ola S1 Electric Scooter चार्जिंगसाठी घरगुती सॉकेटचा पर्याय ओलाच्या माध्यमातून देण्यात आला आहे. या स्कुटरच्या चार्चिंगचा कालावधी हा ६ तास असणार आहे. तर स्कुटर ५० टक्के चार्ज होण्यासाठी १८ मिनिटांचा कालावधी अपेक्षित आहे. ओला फास्ट चार्जरच्या माध्यमातून ही ५० टक्के स्कुटर चार्ज करणे शक्य होईल.

ola features

- Advertisement -

काय आहे फीचर्स ?

ओला इलेक्ट्रिक स्कुटर ही क्रुस कंट्रोलच्या माध्यमातून वेगावर नियंत्रण ठेवते. त्यामुळेच स्कुटरचा वापर हा चढाच्या दिशेला असो वा उतरणीच्या ठिकाणी वेगावर नियंत्रण मिळवण्यासाठी हा क्रुस कंट्रोलचा पर्याय उपयुक्त ठरतो. महत्वाचे म्हणजे या स्कुटरला रिव्हर्सचा गिअरचा पर्यायही आहेय. हिल होल्ड असिस्टच्या माध्यमातून स्कुटरवर नियंत्रणासाठी हा पर्याय उपयुक्त आहे.

ola-s1

या स्कुटरला बिल्ट इन स्पिकर्सदेखील आहेत. या स्पिकर्सचा वापर हा गाण्यांसोबतच फोन कॉल्ससाठीही करणे शक्य आहे.

ola-s1-002

स्कुटरला असणाऱ्या पारंपारिक एनेलॉग स्पिडोमीटर एवजी या स्कुटरला मोठी टच स्क्रिन देण्यात आली आहे. या टन स्क्रिनला अनेक प्रकारच्या डिस्प्ले थीम आहेत. त्यामध्ये MovaOS या सिस्टिमचा वापर करण्यात आला आहे.

ola-s1-pro

किंमत किती ?

ओला इलेक्ट्रिक स्कुटर ही भारतात ९९ हजार ९९९ रूपयांना उपलब्ध होईल. ही किंमत बेस वेरीयंटसाठी ठेवण्यात आली आहे. दिल्ली, गुजरात, महाराष्ट्र आणि राजस्थान या राज्यात वेगवेगळी किंमत ठेवण्यात आली आहे. सर्वात स्वस्त किंमत ही गुजरातमध्ये आहे. तर सर्वाधिक किंमत महाराष्ट्रात ९४ हजार ९९९ रूपये इतकी आहे. चार शहरे वगळून इतरत्र मात्र किंमत ही ९९ हजार ९९९ रूपये इतकी ठेवण्यात आली आहे. तर अतिरिक्त स्पेसिफिकेशनच्या वेरीयंटमध्ये या स्कुटरला Ola S1 Pro साठीची किंमत १ लाख २९ हजार ९९९ रूपये इतकी ठेवण्यात आली आहे.

ola-s1-87


हे ही वाचा – अफगाणिस्तानची राजधानी काबुलला तालिबानचा चहुबाजूंनी वेढा


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -