घरताज्या घडामोडीOmicron Variant: WHOने सांगितले, ओमिक्रॉन व्हेरिएंट कोणत्या व्यक्तीसाठी गंभीर आणि जीवघेणा?

Omicron Variant: WHOने सांगितले, ओमिक्रॉन व्हेरिएंट कोणत्या व्यक्तीसाठी गंभीर आणि जीवघेणा?

Subscribe

कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने (Omicron Variant) यापूर्वी आलेल्या अल्फा, बीटा आणि सर्वात घातक डेल्टा व्हेरिएंटला मागे टाकले आहे. सध्या ओमिक्रॉन हा व्हेरिएंट सर्वात जास्त धोकादायक आणि संसर्गजन्य असल्याचे सिद्ध होत आहे. याशिवाय भारतासह जगातील काही देशांमध्ये ओमिक्रॉनचा सब व्हेरिएंट BA.2 आढळला आहे. यादरम्यान जागतिक आरोग्य संघटनेच्या (world health organization) अधिकारी मारिया वॅन केर्खोव यांनी लोकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. तसेच त्यांनी ओमिक्रॉन व्हेरिएंट कोणत्या व्यक्तींसाठी सर्वात गंभीर आणि जीवघेणा आहे हे सांगितले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या अधिकारी मारिया वॅन केर्खोव म्हणाल्या की, ‘कोरोनाचा सर्वाधिक धोकादायक व्हेरिएंट डेल्टाच्या तुलनेत ओमिक्रॉन कमी घातक आहे.’ जेव्हा मारिया यांना ओमिक्रॉन जर कमी घातक आहे, तर लोकांना रुग्णालयात दाखल होण्याची गरज का भासतेय? आणि लोकांचा मृत्यू का होतोय? असा प्रश्न विचारला असता. तेव्हा यावर उत्तर देताना मारिया म्हणाल्या की, ‘ज्या लोकांना ओमिक्रॉनची लागण होत आहे, त्यांच्यामध्ये धोका निर्माण होतो. मग लक्षणे दिसो किंवा न दिसो तरीही त्यांच्यामध्ये गंभीर होण्याचा किंवा मृत्यूचा धोका असतो.’

- Advertisement -

पुढे मारिया म्हणाल्या की, ‘जे लोकं आधीच आजारग्रस्त आहेत किंवा त्यांचे वय जास्त आहे किंवा ज्या लोकांनी अजून लस घेतली नसेल, तर त्यांच्यामध्ये ओमिक्रॉनची लागण झाल्यानंतर कोरोना गंभीर रुप धारण करू शकतो.’

सर्व लोकांना ओमिक्रॉनची लागण होऊन शकते का? याबाबत मारिया म्हणाल्या की, ‘संसर्ग अधिक पसरण्यात ओमिक्रॉन डेल्टापेक्षा पुढे आहे. लोकांमध्ये अधिक वेगाने पसरत आहे. जरी जगात कोरोनाचे रुग्ण अधिक आढळत आहेत, याचा अर्थ सर्व ओमिक्रॉनचे रुग्ण आहेत, असे नाही.’

- Advertisement -

हेही वाचा – India corona update: पॉझिटिव्ह बातमी! देशातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत ५० हजारांनी घट; २४ तासांत २,५५,८७४ रुग्णांची नोंद


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -