घरट्रेंडिंगऑस्कर २०२०: सर्वोत्कृष्ट अभिनेता मोदी तर सर्वोत्कृष्ट खलनायक अमित शाह!

ऑस्कर २०२०: सर्वोत्कृष्ट अभिनेता मोदी तर सर्वोत्कृष्ट खलनायक अमित शाह!

Subscribe

काँग्रेसच्या ऑस्कर पुरस्काराची सोशल मीडियावर चांगलीचं चर्चा सुरू आहे. काँग्रेसच्या या कल्पनेबद्दल सोशल मीडियावर सध्या नेटकऱ्यांचा कौतुकाचा वर्षाव होत आहे.

लॉस एन्जेलिस ९२ व्या ऑस्कर २०२० सोहळा डॉल्बी थिएटरमध्ये पार पडला. मात्र भारतात देखील ऑस्कर पुरस्कार जाहीर झाला आहे. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटले पण हे खरं आहे. भारतीय काँग्रेस पक्षाने ऑस्कर पुरस्कार जाहीर केले आहेत. काँग्रेसने हे ऑस्कर पुरस्कार ट्विटद्वारे जाहीर केले आहेत. वेगवेगळ्या विभागानुसार हा पुरस्कार देण्यात आला आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी तर सर्वोत्कृष्ट नकारात्मक भूमिका म्हणून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पुरस्कार काँग्रेसकडून जाहीर करण्यात आला आहे. काँग्रेसच्या या कल्पनेचे नेटकरी कौतुक करत आहेत. काँग्रेसचं हे ट्विट सोशल मीडियावर चांगलचं व्हायरल होत आहे.

सर्वोत्कृष्ट अभिनेता या पुरस्कारासाठी साध्वी प्रज्ञा ठाकूर, योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नामांकित करण्यात आलं होत. या अॅवॉर्डचं ट्विट करताना लिहिलं की, ‘या पुरस्काराला जिंकण्याकरिता ५६ इंचाची छाती लागते.’

- Advertisement -

तसंच काँग्रेस सर्वोत्कृष्ट नकारात्मक भूमिकेसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, योगी आदित्यनाथ आणि केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांना नामांकित केलं होत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना सर्वोत्कृष्ट नकारात्मक भूमिकेसाठी ऑस्कर पुरस्कार जाहीर केला. ‘भूतकाळातले गब्बरसिंग आणि मोगॅम्बो हे खलनायक होते. पण नवीन भारताचे खलनायक आले आहेत’, असं या अॅवॉर्डचं ट्विट करताना लिहिलं आहे.

तर सर्वोत्कृष्ट विनोदी भूमिका हा पुरस्कार भाजपचे नेते मनोज तिवारी यांनी जाहीर केला आला. या विभागासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण आणि रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना नामांकित करण्यात आलं होत. या व्हिडिओमध्ये मनोज वाजपेयी योगा करताना दिसत आहेत.

- Advertisement -

सर्वोत्कृष्ट नौटंकी पुरस्कारासाठी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना नामांकित करण्यात आले आहे. हा पुरस्कार दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जाहीर केला आहे.

हे व्हिडिओ ट्विट करण्यात आल्यानंतर लगेचचं सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. यासंदर्भातले ट्विट ३९३ वेळा रिट्विट करण्यात आलं असून २ हजारांपेक्षा अधिक लाईक्स मिळाले आहेत.


हेही वाचा – Video: समुद्रात पडलेला आयफोन व्हेल माशाने आणून दिला


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -