घरदेश-विदेशदेश ऑक्सिजनवर!..

देश ऑक्सिजनवर!..

Subscribe

कोरोनाच्या भयंकर दुसर्‍या लाटेमुळे देशात हाहा:कार उडाला असून ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे रुग्णांबरोबरच रुग्णालयांचे प्रचंड हाल सुरू आहेत. नवी दिल्लीत शुक्रवारी 25 रुग्णांचा ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे मृत्यू झाला आहे. तर त्याच्या आदल्या दिवशी नाशिकमध्ये ऑक्सिजनची टाकी फुटल्यामुळे 24 रुग्णांचा गुदमरून मृत्यू झाला.

देशभरात आज सर्व रुग्णालयांमध्ये ऑक्सिजची मोठी कमतरता भासत असून सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. निवडणुका, प्रचार सभा, कुंभमेळा, राजकीय पक्षांचा एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाचा खेळ, भाजप आणि भाजपतर सत्ताकेंद्र अशी झालेली विभागणी आणि त्यांच्यात सुरू असलेला कलगीतुरा यामुळे कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा मुकाबला करण्यात आलेले अपयश आणि आता तहान लागल्यावर विहीर खोदण्याचा सुरू असलेली खटपट पाहता देश ऑक्सिजनवर गेल्याचे भयानक चित्र आज भारतात दिसत आहे.

- Advertisement -

यावर उच्च न्यायालयाने संताप व्यक्त करत अडथळा आणणार्‍यांना फासावर लटकवू, असा सज्जड दम दिलाय. यानंतर जाग आलेल्या केंद्र सरकारने कोरोना लस,ऑक्सिजन, उपकरणे स्वस्त करण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -