घरमहाराष्ट्रASI: मंदिरांची कामं खोळंबली; जीर्णोद्धाराच्या फक्त सूचना

ASI: मंदिरांची कामं खोळंबली; जीर्णोद्धाराच्या फक्त सूचना

Subscribe

मुंबई: विठ्ठल मंदिराच्या जिर्णोद्धाराचं काम सुरू आहे. विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या गर्भगृहातील ग्रॅनाईट फरशी, फ्लोरिंग काढून टाकायचे काम अंतिम टप्प्यात असून, संपूर्ण मंदिराला पुरातन काळातील दगडी फ्लोरिंग बसवण्यात येत आहे. एकीकडे विठ्ठल मंदिराचं बांधकाम सुरू असताना राज्यातील पाच मंदिरांच्या जिर्णोद्धाराची कामं मात्र खोळंबली आहेत. या मंदिरांच्या जीर्णोद्धाराच्या फक्त सूचना देण्यात आल्याचं दिसत आहे. (ASI Works of temples disrupted Restoration instructions only)

राज्यातील नऊ प्राचीन मंदिरे आणि लेणी-शिल्पे यांचं संवर्धन करून त्यांना आंतरराष्ट्रीय दर्जा देण्याचे काम राज्य सरकारने दोन वर्षांपासून हाती घेतले. मात्र, त्यातलं कार्ला येथील एकवीरा देवी आणि इतर चार मंदिरांच्या जीर्णोद्धाराच्या कामात भारतीय पुरातत्व विभाग सातत्याने खोडा घालत आहे, त्यामुळे काम कधी मार्गी लागणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

- Advertisement -

या मंदिरांचा जीर्णोद्धार केला जाणार

कार्ले येथील एकवीरा मातेचं मंदिर, रत्नागिरीतील धूतपापेश्वर मंदिर, कोल्हापूरमधील खिद्रापूरचे कोपेश्व मंदिर, नाशिक सिन्नरचे गोंदेश्वर मंदिर, छत्रपती संभाजीनगरचे खंडोबा मंदिर, बीडचे पुरुषोत्तमपुरी येथील भगवान पुरुषोत्तम मंदिर, अमरावतीतील लासूर येथील आनंदेश्वर मंदिर, गडचिरोलीतील मार्कंडेश्वर मंदिर, साताऱ्याचे उतेश्वर मंदिर यांचे प्रकल्पांतर्गत संवर्धन करण्यात येणार होते. मात्र सध्या तरी केवळ चार मंदिरांच्या जीर्णोद्धाराची कामं सुरू झाली. हे काम सरकारने 2021 मध्ये हाती घेतलं.

पुरातत्व विभागाकडून वारंवार बदल

कोपेश्वर मंदिर, गोदेश्वर मंदिर, आनंदेश्वर, मार्कंडेश्वस मंदिर ही मंदिरे पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत मोडतात. तर एकवीरा माता मंदिर परिसरात लेणी असल्याने जीर्णोद्धारासाठी एएसआयची परवानगी आवश्यक आहे. मात्र, त्यांनी दोन वर्षांत त्यासाठी परवानगी तर दिली नाही, पण उलट त्यांच्याकडून वारंवार बदल सुचवले जात आहेत.

- Advertisement -

(हेही वाचा: Politics: सत्तेसोबत गेलेल्यांची एकेका जागेसाठीची लाचारी, हतबलता…; किरण मानेंची पोस्ट व्हायरल)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -