Union Budget 2023-24 : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात

संपूर्ण देशभरातील नागरिकांचे लक्ष लागून राहिलेल्या केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्याला आता एक दिवस शिल्लक राहिला आहे. केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी म्हणजेच आजपासून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात होणार आहे.

संपूर्ण देशभरातील नागरिकांचे लक्ष लागून राहिलेल्या केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्याला आता एक दिवस शिल्लक राहिला आहे. केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी म्हणजेच आजपासून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात होणार आहे. हे अधिवेशन 6 एप्रिल पर्यंत चालणार आहे. आजच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला दिवस असून, राष्ट्रपतींचे अभिभाषणा होणार आहे. (parliament budget session begins today president address and economic survey report presented)

राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या देशाचा आर्थिक पाहणी अहवाल सभागृहाच्या पटलावर ठेवणार आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आर्थिक वर्ष 2023-24 सालचा सर्वसाधारण अर्थसंकल्प (Union Budget 2023) सादर करतील. विशेष म्हणजे मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा पाचवा आणि शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प असणार आहे. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावरही चर्चा होणार आहे.

कसे असेल केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशन

  • यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात संसदेचं कामकाज 66 दिवस सुरू राहणार आहे.
  • मधल्या काळात काही दिवसांचा ब्रेक असणार आहे.
  • अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान 14 फेब्रुवारी 2023 ते 12 मार्चपर्यंत सुट्टी असेल.
  • अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा 13 मार्चपासून सुरू होणार आहे.
  • राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात
  • राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त सभेला संबोधित करतील.
  • त्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या 2022-23 च्या आर्थिक सर्वेक्षणाचा अहवाल संसदेच्या पटलावर ठेवतील.

यंदा प्राप्तिकरमुक्त उत्पन्नाच्या मर्यादेत वाढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात असताना अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सर्वसामान्यांना दिलासा देणारे वक्तव्य केले आहे.

पाच लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना कुठलाही नवा कर लागणार नाही. मी स्वत: एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आले आहे, त्यामुळे मी त्यांचे दु:ख समजते, असे वक्तव्य निर्मला सीतारमण यांनी काही दिवसांपूर्वी केलं आहे.


हेही वाचा – संसदेत महाराष्ट्राचा आवाज बुलंद करा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खासदारांना आवाहन