घरताज्या घडामोडीपतंजलीचं कोरोनावरील ‘कोरोनिल’, ‘श्वासारी’ औषध आलं जगासमोर

पतंजलीचं कोरोनावरील ‘कोरोनिल’, ‘श्वासारी’ औषध आलं जगासमोर

Subscribe

संपूर्ण जग सध्या कोरोना विषाणूच्या साथीच्या आजाराशी झगडत आहे. भारतातही या महामारीने कहर केला आहे. जगभरातील शास्त्रज्ञ या आजाराची औषधे शोधण्यात गुंतले आहेत. पतंजली आयुर्वेदने भारतात कोरोना विषाणूचे आयुर्वेदिक औषध लाँच करण्याचा मोठा दावा केला आहे. योगगुरू रामदेव यांचे सहकारी आचार्य बालकृष्ण यांनी आज कोरोनावरील हे औषध भारतात लाँच केलं आहे.

‘कोरोनिल’ आणि ‘श्वासारी’ या औषधामुळे रुग्णपुर्णपणे बरा होतो. याचा प्रयोग १०० रुग्णांवर करण्यात आला. ३ दिवसात ६९ टक्के पॉझिटिव्ह रूग्ण निगेटिव्ह झाले, अशी माहिती योगगुरू रामदेव बाबा यांनी पत्रकारपरिषदेत दिली. सर्व शंकांचं निरसन करण्यास पतंजली समर्थ असल्याचही त्यांनी यावेळी म्हटलं.

- Advertisement -

काल ट्विटकरून याबाबत माहिती देण्यात आली होती. रामदेव यांचे सहकारी आचार्य बालकृष्ण यांनी ट्विट करून कोरोना विषाणूचे आयुर्वेदिक औषध लाँच करण्याविषयी सांगितले होते. “पतंजली योगपीठ उद्या मंगळवारी १ वाजता हरिद्वार येथून कोरोनाच्या एविडेंस बेस्ड फर्स्ट आयुर्वेदिक मेडिसिन कोरोनिलच्या संपूर्ण वैज्ञानिक कागदपत्रासह लॉंच करत आहे.” अशा आशयाचे ट्विट केले होते. आणि आज हे औषध लाँच करण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -