Eco friendly bappa Competition
घर क्राइम रुग्णाने केली महिला डॉक्टरची हत्या, सुरक्षेवरून उच्च न्यायालयाने पोलिसांना फटकारले

रुग्णाने केली महिला डॉक्टरची हत्या, सुरक्षेवरून उच्च न्यायालयाने पोलिसांना फटकारले

Subscribe

महिला डॉक्टरच्या हत्येची गांभीर्याने दखल घेत केरळ उच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि पोलिसांना फटकारले आहे. हायकोर्टाने राज्याच्या पोलीस प्रमुखांना 11 मे रोजी ऑनलाइन हजर राहण्यास सांगितले असून याप्रकरणी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

महिला डॉक्टरच्या हत्येची गांभीर्याने दखल घेत केरळ उच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि पोलिसांना फटकारले आहे. हायकोर्टाने राज्याच्या पोलीस प्रमुखांना 11 मे रोजी ऑनलाइन हजर राहण्यास सांगितले असून याप्रकरणी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायमूर्ती देवन रामचंद्रन आणि न्यायमूर्ती कौसर एडप्पागथ यांच्या खंडपीठाने राज्य सरकारला आदेश देत सांगितले की, तुम्ही डॉक्टरांना संरक्षण देऊ शकत नसाल तर रुग्णालये बंद करा. (Patient kills female doctor, high court reprimands police over security)

हेही वाचा – अदानी – हिंडेनबर्ग वाद ; सर्वोच्च न्यायालयाच्या तज्ज्ञ समितीने सादर केला अहवाल

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, कोट्टारक्कारा येथील तालुका रुग्णालयात बुधवारी उपचारासाठी आलेल्या एका व्यक्तीने 22 वर्षीय महिला डॉक्टर वंदना दास यांची चाकूने भोसकून हत्या केली. यानंतर या रूग्णालयात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. मोठ्या भांडणानंतर पोलिसांनी आरोपीला पुन्हा रुग्णालयात आणले. या घटनेच्या काही वेळानंतर राज्यपाल आणि मुख्यमंत्री रुग्णालयात पोहोचले होते. केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान आणि मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी KIMS हॉस्पिटलला भेट दिली. डॉ. वंदना दास यांचे पार्थिव या रुग्णालयात ठेवण्यात आले.

ड्रेसिंग करताना महिला डॉक्टरवर आरोपीने केला हल्ला
कोट्टारक्करा पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टर त्या व्यक्तीच्या पायावर झालेल्या जखमेवर मलमपट्टी करत असताना, तो माणूस अचानक चिडला आणि त्याने तिथे उभ्या असलेल्या सर्वांवर कात्री आणि चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात महिला डॉक्टर गंभीर जखमी झाल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली. या हल्ल्यात आरोपींना रुग्णालयात आणणारे पोलीस कर्मचारीही जखमी झाले आहेत. ते म्हणाले की, डॉक्टरांना तिरुअनंतपुरममधील एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आले जेथे त्यांचा मृत्यू झाला.

- Advertisement -

घटनेची माहिती देताना कोट्टारक्कारा पोलिस स्टेशनच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपीने स्वतःच्या कुटुंबियांसोबत भांडण आणि हाणामारी केली. त्यानंतर त्याने स्वतःला वाचवण्यासाठी आपत्कालीन क्रमांकावर कॉल केला होता. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून आरोपीला जखमी अवस्थेत तालुका रुग्णालयात दाखल केले. “तो दारू प्यायला होता आणि जेव्हा आम्ही त्याला हॉस्पिटलमध्ये नेले तेव्हा तो हिंसक झाला होता. ज्यावेळी महिला डॉक्टरने त्याला उपचारासाठी नेले, त्यावेळी तो डॉक्टरसोबत एकटा होता. कारण त्या खोलीत जाण्यापासून आम्हाला बंदी घालण्यात आली होती. या दुर्दैवी घटनेनंतर आरोपीला ताब्यात घेण्यात आले, असे यावेळी पोलीस अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. दरम्यान, आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलम 307 (हत्येचा प्रयत्न) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर महिला डॉक्टरच्या मृत्यूप्रकरणी आरोपीवर खुनाचा गुन्हाही दाखल करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

- Advertisment -